टेंभुर्णी : पिंपळनेर (ता. माढा) व करकंब (ता. पंढरपूर) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे दोन्ही युनिट्सचे ऊस गाळप सुरु आहे.
चालू हंगामात गळितास येणाऱ्या उसाला ३०२५ रुपये प्रति टनप्रमाणे बिल देणार असल्याची माहिती या कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष बबनराव शिंदे यांनी संचालक मंडळाबरोबर चर्चा करून सध्याच्या चालू हंगामात गळितास येणाऱ्या उसाला ३०२५ रुपये प्रति टनप्रमाणे बिल दर दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांना प्रत्येक दहा दिवसाला त्यांच्या बँक खात्यावर जमा करत आहे. चालू गळीत हंगामात आजपर्यंत विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर युनिट १ मध्ये ६ लाख ४९ हजार ८४९ मे. टन, तर करकंब युनिट २ मध्ये २ लाख २७ हजार ७३७ मे. टन उसाचे गाळप झाले आहे.
असून एकूण ८ लाख ७७ हजार ६१६ मे.टन उसाचे आतापर्यंत गाळप झालेले आहे. तसेच तोडणी वाहतूक व कामगारांची देणीदेखील प्रत्येक पंधरवड्याला दिली जात आहेत, अशी माहिती कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी दिली.
अधिक वाचा: राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?
