Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कर्जमाफी योजनेसाठी गावनिहाय याद्या जाहीर? कोणते शेतकरी पात्र होतील, तहसीलदारांना निवेदन

कर्जमाफी योजनेसाठी गावनिहाय याद्या जाहीर? कोणते शेतकरी पात्र होतील, तहसीलदारांना निवेदन

Village-wise lists announced for loan waiver scheme? Which farmers are eligible and ineligible, statement to Tehsildars | कर्जमाफी योजनेसाठी गावनिहाय याद्या जाहीर? कोणते शेतकरी पात्र होतील, तहसीलदारांना निवेदन

कर्जमाफी योजनेसाठी गावनिहाय याद्या जाहीर? कोणते शेतकरी पात्र होतील, तहसीलदारांना निवेदन

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफीची (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना) मोठी घोषणा केली आहे.

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफीची (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना) मोठी घोषणा केली आहे.

जळगाव : शासनाच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पदमसिंग पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत (मुद्दल व व्याजासह) कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफीची (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना) मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार असून, नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही बक्षीस मिळणार आहे. ३० सप्टेंबर २०२६ ही कागदपत्रे पूर्ण करण्याची महत्त्वाची तारीख आहे, अन्यथा शेतकरी अपात्र ठरू शकतात.

आता याच पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याची जोर धरू लागली आहे. जेणेकरून संबंधित पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळण्यास मदत होईल. शिवाय शासनास कर्जमाफी करण्यास सोपे जाईल, अशी माहिती या निवेदनातून देण्यात आली आहे. निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, विजय पोपट पाटील, हेमराज ठाणसिंग पाटील, संतोष शिवाजी पाटील, राजू नारायण चौधरी, रोहित कैलास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title : कर्ज माफी योजना के लिए गांव-वार सूचियाँ? तहसीलदार को पात्र किसान, आवेदन

Web Summary : अहिल्यादेवी होल्कर कर्ज माफी योजना के तहत पात्र किसानों की गांव-वार सूची तुरंत जारी करने की मांग। सितंबर 2025 तक बकाया ऋण वाले किसान ₹2 लाख तक की छूट के लिए पात्र, नियमित भुगतान करने वालों के लिए प्रोत्साहन।

Web Title : Village-wise lists for loan waiver scheme? Eligible farmers, application to Tahsildar.

Web Summary : Demand for immediate release of village-wise lists of eligible farmers under Ahilyadevi Holkar loan waiver scheme. Farmers with outstanding loans until Sept 2025, eligible for waivers up to ₹2 lakh, with incentives for regular payers.