Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेती निविष्ठा निर्मीती, रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न

शेती निविष्ठा निर्मीती, रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न

Training on agricultural input production, onion cultivation technology for Rabi season completed | शेती निविष्ठा निर्मीती, रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न

शेती निविष्ठा निर्मीती, रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न

कृषि विभाग नांदगाव, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत किसान दिना निमित्त मंगळवार रोजी मंगळणे येथे नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मीती व रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण पार पडले. 

कृषि विभाग नांदगाव, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत किसान दिना निमित्त मंगळवार रोजी मंगळणे येथे नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मीती व रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण पार पडले. 

कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) तसेच कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषि विज्ञान केंद्र वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत किसान दिना निमित्त मंगळवार (दि.२३) डिसेंबर रोजी मंगळणे (ता. नांदगाव) येथे नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मीती व रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण पार पडले. 

तालुका कृषि अधिकारी नांदगाव रविंद्र डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या गोवर्धन नैसर्गिक शेती शेतकरी गटातील सदस्यांचा समावेश होता. सदर कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र वडेलचे अमित पाटील, विशाल चौधरी, विजय शिंदे, कृषि सखी मनिषा काकड, गटातील अध्यक्ष अशोक सांगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला किसान दिनानिमित्त गोवर्धन नैसर्गिक शेती शेतकरी गटातील शेतकऱ्यांचे कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विजय शिंदे मृदा शास्त्रज्ञ यांनी जमिन आरोग्य, आणि खत व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठा याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच पिक संरक्षण विषय विशेषज्ञ विशाल चौधरी यांनी कांदा पिक लागवड तंत्रज्ञान, कांदा रोपवाटिका, पाणी व्यवस्थापन व एकात्मिक किड व्यवस्थापन दशपर्णी, निमार्क,अग्निस्त्र, ब्रह्मास्त्र इ.नैसर्गिक शेती निविष्ठा बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर गटातील  निवड शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा प्रशिक्षण पुस्तिका व प्रशिक्षण साहित्य वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. 

यासह अशोक पांडुरंग सांगळे यांच्या जैविक निविष्ठा केंद्रावर सेंद्रिय पोषक, नैसर्गिक शेती प्रात्यक्षिक निविष्ठा, गांडुळ खत उत्पादन युनीट, कंपोस्ट, मोसंबी पीक लागवड प्रक्षेत्र पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विभागाचे कृषि सेवक वेहेळगाव सचीन भिवसान व आत्मा विभागाचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक नांदगाव एस. टी. कर्नर यांनी अथक परिश्रम घेतले.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

Web Title : नांदगाँव: जैविक खेती और प्याज की खेती पर प्रशिक्षण संपन्न।

Web Summary : नांदगाँव के कृषि विभाग ने जैविक खेती और रबी प्याज की खेती पर प्रशिक्षण का आयोजन किया। विशेषज्ञों ने किसानों को मिट्टी के स्वास्थ्य, उर्वरक प्रबंधन, प्याज रोपण तकनीक और कीट नियंत्रण पर मार्गदर्शन दिया। किसानों को प्रशिक्षण पुस्तिकाएं मिलीं और उन्होंने एक जैविक इनपुट केंद्र का दौरा किया।

Web Title : Naandgaon: Training on organic farming inputs and onion cultivation held.

Web Summary : Naandgaon's agriculture department organized a training on organic farming inputs and rabi onion cultivation. Experts guided farmers on soil health, fertilizer management, onion planting techniques and pest control. Farmers received training booklets and visited an organic input center.