कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत चालू २०२५-२६ या हंगामातही साखरेचे उत्पादन अधिकच राहणार असल्याचा अंदाज जागतिक साखर संघटनेचा आहे.
या हंगामात १८१७.६७ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. मागील हंगामापेक्षा ५५.५२ लाख टनाने अधिक आहे. उत्पादन वाढणार असले तरी मागणीही त्या पटीतच असतील, त्यामुळे दर कायम राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
यंदा १८१७.६७ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित असले, तरी १८०१.४२ लाख टन जागतिक खप आहे. मागील हंगामाच्या तुलनेत १०.११ लाख टनांनी अधिकचा खप आहे.
या वर्षात जागतिक इथेनॉल उत्पादन १२२.० अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. (२०२४ मध्ये ११९.२ अब्ज लिटरपेक्षा २.३% जास्त), तर वापर १२१.७ अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. (११७.८ अब्ज लिटरपेक्षा ३.३% जास्त)
भारत, कॅनडा व कोलंबियामधील वाढत्या आवकमुळे; युके, ईयू व इतर देशांसोबतच्या व्यापार करारांमुळे अमेरिकेचे उत्पादन ६१.४५ अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
६१.४५ अब्ज लिटरपर्यंत अमेरिकेचे इथेनॉल उत्पादन पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच ३३.३४ अब्ज लिटरपर्यंत ब्राझीलचे इथेनॉल उत्पादन घसरण्याची शक्यता आहे.
| तपशील | हंगाम २०२४-२५ | हंगाम २०२५-२६ |
|---|---|---|
| उत्पादन | १,७६२.१५ | १,८१७.६७ |
| खप | १,७६२.१५ | १,८०१.४२ |
| जादा/कमी | -२९.१६ | १६.२५ |
| आयात मागणी | ६४४.५८ | ६२९.६२ |
| निर्यातीस उपलब्ध | ६३७.४० | ६४७.३३ |
| अखेर शिल्लक | ९५१.५० | ९५०.०४ |
गतवर्षीपेक्षा साखरेच्या उत्पादनात थोडीफार वाढ दिसत आहे. परंतु, खपही वाढणार असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार-पेठेत दराबाबत स्थिरता राहील किंवा काही प्रमाणात वाढही होऊ शकते. - पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक
अधिक वाचा: प्रोत्साहन योजनेसाठी राज्य सरकार कशी करणार साखर कारखान्यांची निवड? काय आहेत निकष?
