पंजाबसह भारतातील अनेक राज्यांत अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, जागतिक पातळीवर अन्न-धान्याचे उत्पादन विक्रमी होणार असल्याचा अंदाज अन्न व कृषी संघटनेकडून वर्तविण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने (एफएओ) २०२५ मध्ये जगात २९६ कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
मका आणि ज्वारीच्या पिकांत वाढ झाल्यामुळे उत्पादन वाढणार आहे. यंदा Millet भरडधान्याचे उत्पादन १६० कोटी टन होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५.९ टक्क्याने जास्त आहे. अमेरिकेत प्रचंड तर ब्राझील आणि मेक्सिकोत मोठ्या प्रमाणावर मका होणार आहे.
जगातील प्रमुख धान्य उत्पादक देश
धान्य | प्रमुख उत्पादक देश | विशेष वैशिष्ट्य |
---|---|---|
गहू (Wheat) | चीन, भारत, रशिया, अमेरिका, फ्रान्स | चीन व भारत मिळून जगातील ३५% पेक्षा जास्त गहू उत्पादन करतात. |
तांदूळ (Rice) | चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, व्हिएतनाम | चीन एकटाच जगातील २८% तांदूळ पिकवतो. |
मका/कणीस (Maize/Corn) | अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, भारत | अमेरिका एकटी सुमारे ३०% उत्पादन करते. |
बार्ली (Barley) | रशिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया | प्रामुख्याने बिअर आणि प्राण्यांच्या खाद्यासाठी. |
ज्वारी (Sorghum) | अमेरिका, नायजेरिया, सुदान, भारत, मेक्सिको | आफ्रिकन देशांत मुख्य अन्नधान्य. |
जगातील एकूण धान्य उत्पादनात चीन, भारत, अमेरिका, रशिया आणि ब्राझील हे देश आघाडीवर आहेत.
अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार