कोल्हापूर : रासायनिक खतांसह शेती क्षेत्रातील विविध घटकांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारसीने पीक कर्ज मर्यादेत वाढ केली आहे.
त्यानुसार आडसाली उसाला जास्तीत जास्त आता एकरी ७२ हजार रुपये मिळणार असून उसाच्या पीक कर्ज मर्यादेत २४ ते २७ टक्क्यांपर्यंत त्याचबरोबर इतर पिकांच्या कर्ज मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे.
तांत्रिक नाबार्ड जिल्हा बँकांच्या माध्यमातून विकास संस्थांमधून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करते. राज्यस्तरीय समितीच्या निकषानुसारच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते.
गेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ४६ हजार ते ६७ हजार ९६० रुपयापर्यंत पीक कर्ज मिळत होते; मात्र आता त्यात वाढ केली आहे.
जिल्हा बँक देते २४०० कोटी पीक कर्ज
◼️ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना २४०० कोर्टीचे पीक कर्ज देते.
◼️ राज्याच्या तुलनेत हा सर्वाधिक कर्ज पुरवठा असून इतर बँकांना ७०० कोटी असे ३१०० कोटींपर्यंत कर्ज वाटप केले जाते.
हंगाम २०२६-२७ मध्ये वाढीव पीक कर्ज
◼️ राज्य शासनाने वाढीव पीक कर्ज मर्यादेस मान्यता दिली आहे.
◼️ त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश बँकांना दिले असून हंगाम २०२६-२७ पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
असे मिळणार कर्ज..
पीक - जास्तीत जास्त कर्ज मर्यादा एकरी (रु.)
◼️ आडसाली ऊस - ७२,०००
◼️ पूर्व हंगामी ऊस - ६८,०००
◼️ सुरू ऊस - ६८,०००
◼️ खोडवा ऊस - ५४,०००
◼️ खरीप भात - ३०,०००
◼️ सोयाबीन - ३०,०००
◼️ खरीप ज्वारी - २२,४००
◼️ रब्बी ज्वारी - २१,६००
राज्यस्तरीय तांत्रिक समितीने नवीन पीक कर्ज मर्यादेबाबत निर्णय घेतला आहे. बँकेकडून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. - जी. एम. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक
अधिक वाचा: प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान
