Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'हा' साखर कारखाना अंतिम ऊस दरात १०० रुपये वाढवून देणार; टनाला किती रुपये मिळणार?

राज्यातील 'हा' साखर कारखाना अंतिम ऊस दरात १०० रुपये वाढवून देणार; टनाला किती रुपये मिळणार?

'This' sugar factory in the state will increase the final sugarcane price by Rs 100; How much will it get per ton? | राज्यातील 'हा' साखर कारखाना अंतिम ऊस दरात १०० रुपये वाढवून देणार; टनाला किती रुपये मिळणार?

राज्यातील 'हा' साखर कारखाना अंतिम ऊस दरात १०० रुपये वाढवून देणार; टनाला किती रुपये मिळणार?

हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या तोडग्यानुसार प्रतिटनाला १०० रुपये लवकरच दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी व वाहतूक कंत्राटदारांनी आपापल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या तोडग्यानुसार प्रतिटनाला १०० रुपये लवकरच दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी व वाहतूक कंत्राटदारांनी आपापल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

सेनापती कापशी: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या १६ जानेवारी ते ३१ जानेवारी या पंधरवड्यातील ७५,२३५ टन उसाची बिले जमा केली आहेत.

प्रतिटनाला ३४०० रुपयेप्रमाणे होणारी २५ कोटी ५८ लाख रुपयांची ऊस बिले जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.

तोडणी वाहतूक बिलेही अदा केली आहेत. एक फेब्रुवारी २०२६ पासून ते हंगाम समाप्तीपर्यंतची ऊस बिले व हंगाम समाप्तीपर्यंतची उर्वरित तोडणी-वाहतूक बिले लवकरच अदा केली जाणार आहेत.

दरम्यान, हा हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या तोडग्यानुसार प्रतिटनाला १०० रुपये लवकरच दिले जाणार आहेत. असे प्रतिटनाला एकूण ३,५०० रुपये ऊस बिल दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी व वाहतूक कंत्राटदारांनी आपापल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील एकूण गाळपापैकी आजअखेर ५,६३,७०५ मेट्रिक टनाची १९१ कोटी ६६ लाखांची बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत.

चालू हंगामात को-जन प्रकल्पात साडेसहा कोटी युनिट्स वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजअखेर सहा कोटी ११ लाख युनिट्स इतकी वीजनिर्मिती करून चार कोटी ३२ लाख युनिट्स वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे.

कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे एकूण दोन कोटी लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे. आजअखेर एक कोटी आठ लाख लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मिती झाली आहे. त्यापैकी ५५ लाख लिटर्स इतके इथेनॉल व स्पिरिट पुरवठा केला आहे.

६,७०,६५५ क्विंटल साखर उत्पादित
हंगाम समाप्तीपर्यंत कारखान्याने एकूण ६,०२,६९८ इतक्या मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी १२.४० टक्के साखर उताऱ्यासह ६,७०,६५५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

अधिक वाचा: २०१९ नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही आता पीएम व नमो किसानचा लाभ मिळण्याची शक्यता; निकष बदलणार?

Web Title : चीनी मिल ने गन्ने की अंतिम दर में ₹100 की वृद्धि की; प्रति टन दर?

Web Summary : सेनापति कापशी चीनी मिल गन्ने की दर में ₹100 प्रति टन की वृद्धि करेगी, जो कुल ₹3,500 होगी। किसानों को पहले ही ₹25.58 करोड़ का भुगतान किया जा चुका है। मिल ने 12.40% चीनी रिकवरी दर के साथ 6,02,698 मीट्रिक टन गन्ने की पेराई की है।

Web Title : Sugar Factory Increases Final Sugarcane Rate by ₹100; Rate Per Ton?

Web Summary : Senapati Kapshi sugar factory to increase sugarcane rate by ₹100 per ton, totaling ₹3,500. ₹25.58 crore already paid to farmers. The factory has crushed 6,02,698 metric tons of sugarcane with a 12.40% sugar recovery rate.