Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'या' साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामाचे १८३ कोटी ऊस बिल केले जमा

राज्यातील 'या' साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामाचे १८३ कोटी ऊस बिल केले जमा

This sugar factory in the state has deposited the sugarcane bill for this crushing season | राज्यातील 'या' साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामाचे १८३ कोटी ऊस बिल केले जमा

राज्यातील 'या' साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामाचे १८३ कोटी ऊस बिल केले जमा

सन २०२५-२६ या वर्षातील गळीत हंगामासाठी दि. २८ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलांच्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत.

सन २०२५-२६ या वर्षातील गळीत हंगामासाठी दि. २८ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलांच्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत.

सोलापूर : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कारखान्याने दि. २७ जानेवारीपर्यंतच्या ऊस बिलाच्या रकमा जमा केल्या आहेत.

सन २०२५-२६ या वर्षातील गळीत हंगामासाठी दि. २८ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलांच्या रकमा जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी मनोज सावंत यांनी दिली.

जय हिंद शुगरने यंदाच्या गळीत हंगामात ६ लाख ६६ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. या उसपोटी कारखान्याने केवळ यंदाच्या गळीत हंगामात १८३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.

आर्थिक अडचणीत असतानाही जयहिंदच्या व्यवस्थापनाने दिनांक २७ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांना संपूर्ण ऊस बिलाची रक्कम खात्यात जमा केली आहे.

दिनांक २८ जानेवारी, ६,७,८ फेब्रुवारी २०२६ या चार दिवसांत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिल अद्याप देणे बाकी आहेत.

ही सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये रक्कम दिनांक १२ ते १३ फेब्रुवारी पर्यंत अदा केली जाईल असा विश्वास कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी मनोज सावंत यांनी दिली.

आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने उभे केले आहेत. ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांना काहीसा त्रास झाला, त्यांनी तो सोसला. भूमिपुत्रांनी उभी केलेली ही साखर कारखानदारी शेवटी भूमिपुत्रांनींच जपली पाहिजे. - गणेश माने-देशमुख, चेअरमन, जयहिंद शुगर, आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर

अधिक वाचा: आता सातबाऱ्यावर नको तलाठ्याचा सही-शिक्का; १५ रुपयांतच 'इथे' मिळणार डिजिटल सहीचा सातबारा

Web Title: This sugar factory in the state has deposited the sugarcane bill for this crushing season