सोलापूर : शासनाकडून गाळप परवाना न घेता उसाचे गाळप केल्याप्रकरणी धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याला २८ कोटी ३५ लाख रुपये दंड करण्यात यावा.
असा प्रस्ताव सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने राज्याच्या साखर आयुक्ताकडे पाठवला आहे.
गोकुळ शुगरने मागील सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना मागणी अर्ज केला होता.
मात्र साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपी रक्कम थकवल्याने गाळप परवाना दिला नव्हता. तरीही गोकुळ शुगरने मागील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप केले होते.
विनापरवाना गाळप केल्याप्रकरणी गोकुळ शुगरला मागील वर्षी १५ कोटी ५८ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता.
यंदाच्या गळीत हंगामात देखील गोकुळ शुगरने हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित होते. मात्र तसे केले नाही.
त्यामुळे सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने यंदाच्या गळीत हंगामातील विनापरवाना गाळप केलेल्या उसावर दंड आकरण्यात येणार आहे.
प्रतिटन ५०० रुपयेप्रमाणे २ लाख ५५ हजार मे.टन उसासाठी १२ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात यावा असा प्रस्ताव साखर आयुक्तालयाकडे पाठवला आहे.
अधिक वाचा: राज्यातील 'हा' साखर कारखाना अंतिम ऊस दरात १०० रुपये वाढवून देणार; टनाला किती रुपये मिळणार?
