थंडी वाढू लागली की सर्दी-खोकला, घसा दुखणे, त्वचा कोरडी पडणे, ऊर्जा कमी होणे यांसारख्या समस्या अनेकांना जाणवतात. या सगळ्यापासून शरीराचं संरक्षण करणारं एक नैसर्गिक अस्त्र आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात ताजे, मऊ आणि रसाळ अंजीर मिळायला लागतात. हे फळ दिसायला साधे वाटले तरी त्यात आरोग्यासाठी अप्रतिम गुणधर्म दडलेले असतात.
थंडीच्या दिवसांत अंजीर खाणे शरीराला ऊब, पोषण आणि ऊर्जा देणारे ठरते. त्यामुळे हे फळ हिवाळ्यात नक्की आहारात असावे, अंजीर खाणे नक्कीच फायद्याचे ठरते.
तसेच चवीलाही हे फळ छान असते. त्यामुळे लहान मुलेही आवडीने खातात. तसेच ते फळ छान मऊ असते, त्यामुळे वृद्ध व्यक्तीही खाऊ शकतात.
ताजे अंजीर पचनासाठी खूप हलके असते आणि त्यातील नैसर्गिक तंतुमय पोट साफ ठेवते. थंडीत पचन थोडे मंद होते, जडपणा जाणवतो, बद्धकोष्ठता वाढते, अशा वेळी अंजीर नियमित खाल्ल्यास पचन सुधारते आणि पोट सतत स्वच्छ राहते.
अंजिरातील नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते, शरीरासाठी हे फळ नक्कीच पौष्टिक असते. त्यामुळे रोज एक अंजीर खाणे फायदेशीर आहे.
अंजीर खाण्याचे फायदे
◼️ अंजीर पचनशक्ती वाढवते.
◼️ पोषणाच्या दृष्टीने अंजीर हे अत्यंत समृद्ध फळ आहे.
◼️ त्यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
◼️ ही खनिजे हाडे मजबूत ठेवतात, रक्तातील हिमोग्लोबिन सुधारतात आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखतात.
◼️ हिवाळ्यात स्नायूंवर सूज येते आणि ताण वाढण्याची समस्या वाढते, अंजिरातील पोटॅशियम यात मोठी मदत करते.
◼️ त्यामुळे अंजीर फक्त पचनच नाही, इतरही अनेक गोष्टी सुधारते.
रोगप्रतिकारशक्ती, वाईट कोलेस्टेरॉल होईल कमी
◼️ हृदयासाठीही अंजीर अत्यंत चांगले मानले जाते. त्यातील तंतू रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात.
◼️ त्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते आणि हृदयावरचा ताण कमी होतो.
◼️ थंड हवेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हिवाळ्यात हृदयाला जास्त काम करावे लागते.
व्हिटॅमिन ए, सी शरीराची प्रतिकार शक्ती वाढविते
◼️ अंजीरमध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला किंवा लहानमोठे इन्फेक्शन सहज होतात.
◼️अंजिरातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
◼️ त्वचा कोरडी, फिकट आणि निस्तेज होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे दिलासा मिळतो.
अधिक वाचा: 7/12 Download: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर
