Lokmat Agro >शेतशिवार > राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील या साखर कारखान्यांना मिळणार एनसीडीसीकडून कर्ज

राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील या साखर कारखान्यांना मिळणार एनसीडीसीकडून कर्ज

These sugar factories in the state will get loans from NCDC on the guarantee of the state government | राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील या साखर कारखान्यांना मिळणार एनसीडीसीकडून कर्ज

राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील या साखर कारखान्यांना मिळणार एनसीडीसीकडून कर्ज

Loan for Sugar Factory राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील आठ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) ने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loan for Sugar Factory राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील आठ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) ने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील आठ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) ने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

’शरद’, ‘मंडलीक’, ‘कुंभी’, ‘राजाराम’, ‘आजरा’ या कारखान्यांना ७४८ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध हाेणार आहे. या अर्थसहाय्यामुळे कारखान्यांना बूस्टर डोस मिळणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून साखरेला भाव चांगला असला तरी एफआरपीसह ऊस तोडणी-ओढणीच्या दरात वाढ आणि कर्जाचा बोजा यामुळे कारखान्यांसमोर अडचणी आहेत.

ज्यांची आर्थिक स्थिती अगोदरच नाजूक आहे, त्यांची तर पुरती दमछाक झाली आहे. अशा कारखान्यांना कमी व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा असतो.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील आठ कारखान्यांच्या कर्जास मंजुरी दिली आहे.

महायुतीच्या कारखानदारांची बोटे तुपात
राज्यातील सत्तेचा फायदा प्रत्येक नेत्याला होत असतो. या हमीमध्ये आठ पैकी तब्बल सात कारखाने हे महायुतीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (आजरा), बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (अजिंक्यतारा), आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर (शरद), आमदार चंद्रदीप नरके (कुंभी), आमदार अमल महाडिक (राजाराम), माजी खासदार संजय मंडलिक (हमीदवाडा) यांचा समावेश आहे. काँग्रेसचे दिलीपराव देशमुख यांच्या मारुती महाराज कारखान्याला १०९ कोटी रुपये दिले आहेत.

पैशाचा योग्य विनियोग होण्याची गरज
राजकीय तडजोड म्हणून राज्य शासन कारखान्यांना कर्ज देण्यासाठी हमी देते. पण, त्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग होण्याची गरज आहे. अनेक वेळा त्याचा वापर योग्य पद्धतीने न झाल्याने कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यातून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू होते.

दोन वर्षे हप्त्याची सवलत
एनसीडीसीकडून मिळालेल्या कर्जाला पहिली दोन वर्षे हप्ते नाहीत. त्याशिवाय हे कर्ज केवळ ८ टक्क्यांनी मिळते, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ११ टक्क्यांनी घेतलेले कर्ज यातून भागवता येते.

असे मिळणार कर्ज
शरद - १८८.४६ कोटी
राजाराम - १६५ कोटी
हमीदवाडा - १३९ कोटी
कुंभी - १३३.४४ कोटी
आजरा - १२२.६८ कोटी

अधिक वाचा: शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिले नाहीत; या १७ साखर कारखान्यांना आयुक्तांनी दिल्या नोटीसा

Web Title: These sugar factories in the state will get loans from NCDC on the guarantee of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.