Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > १५ दिवसांत या चार कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचा एफआरपीचा हिशोब चुकता

१५ दिवसांत या चार कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचा एफआरपीचा हिशोब चुकता

These four factories paid the FRP accounts of sugarcane producers within 15 days | १५ दिवसांत या चार कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचा एफआरपीचा हिशोब चुकता

१५ दिवसांत या चार कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचा एफआरपीचा हिशोब चुकता

Sugarcane FRP 2024-25 पंधरा दिवसांत चार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचा हिशोब चुकता केला असला तरी आजही जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा थकबाकीचा आकडा १०५ कोटी इतका आहे.

Sugarcane FRP 2024-25 पंधरा दिवसांत चार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचा हिशोब चुकता केला असला तरी आजही जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा थकबाकीचा आकडा १०५ कोटी इतका आहे.

सोलापूर : पंधरा दिवसांत चार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचा हिशोब चुकता केला असला तरी आजही जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा थकबाकीचा आकडा १०५ कोटी इतका आहे.

सिद्धेश्वर, जय हिंद, गोकुळ व मातोश्री लक्ष्मी शुगर या कारखान्यांची थकबाकी काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. मेअखेरला १५ साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे एफआरपीनुसार १३४ कोटी ४२ लाख रुपये थकले होते.

१५ दिवसांत २९ कोटी तीन लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. १५ जूनपर्यंत एफआरपीनुसार १०५ कोटी इतकी थकबाकी कारखान्यांकडे आहे.

जून महिन्यात १५ दिवसांत श्री. विठ्ठल गुरसाळे, धाराशिव सांगोला, अवताडे शुगर व आष्टी शुगर या साखर कारखान्यांनी थकबाकी दिली आहे, तर इतर काही कारखान्यांनी काही रक्कम दिली आहे.

साखर कारखान्यांची थकबाकी
जय हिंद शुगर - ३१ कोटी.
सिद्धेश्वर कुमठे - २४ कोटी.
गोकुळ शुगर - १७ कोटी २२ लाख.
सिद्धनाथ शुगर - ८ कोटी.
मातोश्री लक्ष्मी शुगर - ५ कोटी ३८ लाख.
इंद्रेश्वर शुगर - ५ कोटी.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे - ४ कोटी ५ लाख.
भैरवनाथ आलेगाव - ३ कोटी.
भैरवनाथ लवंगी - १ कोटी २८ लाख.
भीमा सहकारी - १ कोटी २६ लाख.
पांडुरंग श्रीपूरकडे सहा कोटी इतकी रक्कम थकली असली तरी ही रक्कम येत्या सणाला दिली जाते.

धाराशिव जिल्ह्यात साडेतेरा कोटी
धाराशिव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार १३ कोटी ५० लाख रुपये थकले आहेत. जुना भाऊसाहेब बिराजदार कारखान्यांकडे १० कोटी १५ लाख, धाराशिव शुगर चोराखळी कळंब या कारखान्यांकडे ९९ लाख तर भीमाशंकर वाशी कारखान्यांकडे २ कोटी ३७ लाख रुपये असे एकूण १३ कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत.

२८ कारखान्यांवर आरआरसी
साखर आयुक्त कार्यालयाने राज्यातील २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. आरआरसी कारवाई केलेल्यापैकी लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, श्री. संत दामाजी, अवताडे शुगर, धाराशिव शुगर सांगोला या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे एफआरपीप्रमाणे संपूर्ण पैसे दिले आहेत.

अधिक वाचा: आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हॉटस ॲपवर

Web Title: These four factories paid the FRP accounts of sugarcane producers within 15 days