Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'ह्या' २५ शेतकरी गटांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार; शासन निर्णय जारी

राज्यातील 'ह्या' २५ शेतकरी गटांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार; शासन निर्णय जारी

'These' 25 farmer groups in the state will get a reward of Rs 5 lakh each; Government decision issued | राज्यातील 'ह्या' २५ शेतकरी गटांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार; शासन निर्णय जारी

राज्यातील 'ह्या' २५ शेतकरी गटांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार; शासन निर्णय जारी

Farmer Cup 2024 Winner शेतकऱ्यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक संकट येत असतात जसे की, खराब बियाणे, दुष्काळ, आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव या सर्व अडचणींचा सामना एकटा शेतकरी करू शकत नाही.

Farmer Cup 2024 Winner शेतकऱ्यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक संकट येत असतात जसे की, खराब बियाणे, दुष्काळ, आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव या सर्व अडचणींचा सामना एकटा शेतकरी करू शकत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक संकट येत असतात जसे की, खराब बियाणे, दुष्काळ, आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव या सर्व अडचणींचा सामना एकटा शेतकरी करू शकत नाही.

यासाठी FPO (शेतकरी उत्पादक संस्था) हे प्रभावी माध्यम आहे. FPO ही शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था असून, सामूहिक शक्तीचा वापर करून अनेक समस्या सोडवू शकते. सध्या काही यशस्वी FPO आहेत, ज्यांनी सामूहिकतेच्या जोरावर शेतीला मजबूत आर्थिक दिशा दिली आहे. 

पाणी फाउंडेशन मार्फत आयोजित केलेल्या "फार्मर कप २०२४” या पुरस्कार सोहळ्यात मा. मुख्यमंत्री महोदय यांनी घोषित केलेल्या, राज्यस्तरीय सर्वोत्तम २५ गटांना प्रत्येकी रु.५.०० लाख याप्रमाणे एकूण रु.१.२५ कोटी इतकी बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली होती.

त्याप्रमाणे ही रक्कम शासन निर्णयान्वये आयुक्त (कृषी) पुणे, यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदरची बक्षिसाची रक्कम सदर गटांना "एक वेळची विशेष बाब म्हणून देण्यात येत आहे.

फार्मर कप २०२४ पुरस्कार घोषित केलेले राज्यस्तरीय सर्वोत्तम २५ गट

अ. क्र.जिल्हातालुकागावगट क्र.गटाचे नावपीक
1अकोलाअकोटअडगाव खु.3727लक्ष्मीमाता शेतकरी उत्पादक गट अडगाव खुर्द.कापूस
2अकोलाबार्शिटाकळीराजंदा1898भरारी महिला शेतकरी गट राजंदासोयाबीन
3अमरावतीवरुडघोराड478परिश्रम शेतकरी गटवांगी
4अहमदनगरनगरसोनेवाडी (चास)1693सुकन्या महिला शेतकरी गटतूर
5अहमदनगरसंगमनेरसावरगाव तळ1687साईकृपा कृषी उत्पादक महिला गटमका
6छ. संभाजीनगरखुलताबादसोबलगाव1578उंच भरारी महिला शेतकरी गट नंदाकापूस
7छ. संभाजीनगरखुलताबादसोबलगाव2035अन्नदाता महिला शेतकरी गटकापूस
8छ. संभाजीनगरफुलंब्रीचिंचोली (नाकीब)3513जय मल्हार महिला शेतकरी गटकापूस
9छ. संभाजीनगरफुलंब्रीमहालकिन्होळ2921शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमठाकापूस
10नागपूरनरखेडउमठा3159जिजाऊ महिला कापूस उत्पादक गट खरसोलीकापूस
11नागपूरनरखेडखरसोली3967फिनिक्स एग्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जैनकवाडीतूर
12पुणेबारामतीजैनकवाडी2962माऊली शेतकरी गट गांधनवाडीतूर
13बीडआष्टीगांधनवाडी323समृद्धी महिला शेतकरी गटकापूस
14बीडबीडईट245महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी गट मौजे लिहा बु.कापूस
15बुलढाणामोताळालिहा बु.2259माऊली शेतकरी गट नागीसोयाबीन
16वाशीममंगरुळ पीरनागी401भाग्योदय शेतकरी गट तुरचीमका
17सांगलीतासगावतुरची2759कृषीमाता महिला शेतकरी गटमका
18सांगलीतासगावसावर्डे369कृषीलक्ष्मी महिला शेतकरी गटघेवडा
19साताराकोरेगावआसनगाव5684महालक्ष्मी महिला शेतकरी गटघेवडा
20साताराकोरेगावदेऊर1849सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरेसोयाबीन
21साताराखटावभोसरे3839यशवंत शेतकरी गट पिंपरीतूर
22सातारामाणपिंपरी6431कृषीयोद्धा फिसरे शेतकरी गटतूर
23सोलापूरकरमाळाफिसरे3517जिद्द शेतकरी गट सरपडोहतूर
24सोलापूरकरमाळासरपडोह268जय बिरसा मुंडा शेतकरी गट कवडासोयाबीन
25हिंगोलीकळमनुरीकवडा60जय बिरसा मुंडा शेतकरी गट कवडासोयाबीन

फार्मर कप पुरस्कार प्राप्त गटांनी सदर रकमेचा विनियोग कसा करावा?
१) यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन.
२) यंत्र भाडे सेवा केंद्र-ज्यामुळे लहान शेतकऱ्यांनाही कमी किमतीत आधुनिक यंत्रे वापरता येतील.
३) शेतीच्या हंगामापूर्वीची तयारी- जसे की, बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी इ.
४) साठवणूक सुविधा निर्माण करणे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तयार करणे.

अधिक वाचा: राज्यातील 'या' तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी व पूर आपत्तीच्या सवलती; तालुक्यांची सुधारित यादी आली

Web Title : महाराष्ट्र सरकार 25 किसान समूहों को ₹5 लाख का पुरस्कार देगा।

Web Summary : महाराष्ट्र सरकार 'फार्मर कप 2024' में चयनित 25 किसान समूहों को ₹5 लाख का पुरस्कार देगा। धन मशीनीकरण, बुनियादी ढांचे और प्री-सीजन की तैयारी को बढ़ावा देगा।

Web Title : Maharashtra awards ₹5 lakh each to 25 farmer groups.

Web Summary : Maharashtra government to award ₹5 lakh each to 25 farmer groups selected in 'Farmer Cup 2024'. The funds will boost mechanization, infrastructure, and pre-season preparations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.