Join us

टोमॅटोने दिला दगा दोडका ठरला वरदान; दिवसाआड मिळतोय सुमारे ५०० किलोचा तोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:41 IST

जमिनीत पाण्याचा निचरा झाल्यानंतर दोडका घेतला सध्या दिवसाआड ५०० किलो दोडका मिळत असून दरही चांगला आहे. १५ टन दोडका उत्पादन मिळाल्यास खर्च वजा करून सहा लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे.

सूर्यकांत निंबाळकरआदर्की तालुक्यात मे महिन्यात उन्हाळी पाऊस झाल्यामुळे आदर्की बुद्रुक येथील शेतकरी विजयकुमार जाधव यांचे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. पण त्यांनी हार न मानता त्याच जमिनीत पाण्याचा निचरा झाल्यानंतर दोडका घेतला

सध्या दिवसाआड ५०० किलो दोडका मिळत असून दरही चांगला आहे. १५ टन दोडका उत्पादन मिळाल्यास खर्च वजा करून सहा लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे.

पश्चिम भागात उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोपीक घेतले होते; पण मे महिन्यात जोरदार पाऊस सुरू होता. याचा फटका टोमॅटोला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

अशाच प्रकारे आदर्की बुद्रुक येथील शेतकरी विजयकुमार पंढरीनाथ जाधव यांचाही एक एकरमधील टोमॅटो तोडणीस आला होता.

पण तो पाण्यात गेल्याने चार-पाच लाख रुपयांचे नुकसान झाले तरीही त्यांनी खचून न जाता पाण्याचा निचरा होताच दोडक्याची लागण केली.

दोडक्याचे पीक जोमात आल्याने दिवसाआड सुमारे ५०० किलो दोडके मिळत आहेत. बाजारातही किमान ४० रुपये दर मिळू लागलाय त्यामुळे उत्पन्नाची खात्री निर्माण झाली आहे.

एक एकर क्षेत्रातून दोडक्याचे १५ टन उत्पादन मिळाल्यास खर्च वजा जाता सहा लाख रुपये फायदा होणार असल्याचा त्यांना अंदाज आहे.

उन्हाळ्यात टोमॅटो लावला; पण मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पीक पाण्यात गेले. मोठा तोटा झाला. दोडक्यावर रोग कमी पडतो. त्यामुळे खर्च कमी येतो. सध्या दिवसाआड दोडका तोडावा लागत आहे. एका दोडक्याचे वजन २०० ते ३०० ग्रॅम असल्यास दर व मागणी चांगली राहते. - विजयकुमार जाधव, शेतकरी

अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनटोमॅटोभाज्यापाऊसबाजारमार्केट यार्ड