Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतजमिनीच्या रखडलेल्या मोजण्या व हद्द कायमची कामे होणार आता स्पीडने; सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

शेतजमिनीच्या रखडलेल्या मोजण्या व हद्द कायमची कामे होणार आता स्पीडने; सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

The pending measurement and demarcation of agricultural land will now be completed at speed; the government has taken this important decision | शेतजमिनीच्या रखडलेल्या मोजण्या व हद्द कायमची कामे होणार आता स्पीडने; सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

शेतजमिनीच्या रखडलेल्या मोजण्या व हद्द कायमची कामे होणार आता स्पीडने; सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

shet jamin mojani भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते. तथापि, मोजणीसाठी वाढते अर्ज व मर्यादित शासकीय मनुष्यबळामुळे जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत.

shet jamin mojani भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते. तथापि, मोजणीसाठी वाढते अर्ज व मर्यादित शासकीय मनुष्यबळामुळे जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत.

जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्यात येणार आहे.

हा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

याबद्दलची कार्यपद्धती निश्चित करून लवकरच शासनाने आदेश जारी केला आहे. निश्चित वेळापत्रकानुसार जमिनीची मोजणी व हद्द कायम करावी लागेल.

कागदपत्रे नसल्यास पंचनामा केला जाणार आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याची कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रखडलेल्या जमीन मोजणीच्या कामांना गती येणार आहे.

प्रशिक्षित उमेदवार
◼️ निवड झालेल्या उमेदवारांना भूमी अभिलेख विभागामार्फत दोन आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. ते पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेतली जाईल.
◼️ पात्र उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर येथील लँड रेकॉर्ड ट्रेनिंग अकादमीकडून दोन वर्षासाठी वैध असलेला परवाना दिला जाईल.

'ई-मोजणी २.०' या आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर
◼️ भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते. तथापि, मोजणीसाठी वाढते अर्ज व मर्यादित शासकीय मनुष्यबळामुळे जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत.
◼️ याकरिता जिल्हास्तरावर परवानाधारक भूमापकांची नियुक्ती तांत्रिकदृष्ट्या पात्र असणाऱ्या एजन्सीकडून करण्यात येत आहे.
◼️ कामात अचूकता राहावी यासाठी या भूमापकांना 'ई-मोजणी २.०' या आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे.
◼️ प्रत्येक भूमापकास दरमहा किमान वीस मोजणी प्रकरणे निकाली काढणे बंधनकारक करण्यात आले आहे.
◼️ मोजणीनंतरचा नकाशा आणि कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची समिती
◼️ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
◼️ त्यामध्ये एन.आय.सी.चे तांत्रिक सल्लागार, आय.टी.आय.चे प्राचार्य आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश आहे.
◼️ खासगी भूमापक म्हणून आय.टी.आय. (सर्व्हेइंग) आदी पदवीधरांची नियुक्ती होणार आहे.

केवळ जागेची मोजणी न झाल्यामुळे अनेक कामे थांबून राहतात. उद्योजक आणि नवीन व्यवसायासाठी सुरुवात देखील करता येत नाही. राज्याच्या प्रगतीसाठी बाधा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता तातडीने मोजणी होईल, सर्वसामान्यांचा मनस्ताप वाचेल, वेळ वाचेल. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

अधिक वाचा: जमिनीची तोंडी वाटणी व पोट हिश्याचे वाद आता मिटणार; सातबारा व नकाशावर होणार 'हे' बदल

Web Title : भूमि माप में तेजी: महाराष्ट्र सरकार ने प्रशिक्षित सर्वेयरों को मंजूरी दी

Web Summary : महाराष्ट्र भूमि माप को गति देने के लिए प्रत्येक जिले में प्रशिक्षित सर्वेयरों और एजेंसियों की नियुक्ति करेगा। सटीकता के लिए आधुनिक सॉफ्टवेयर 'ई-माप 2.0' का उपयोग किया जाएगा। जिला कलेक्टर की अध्यक्षता वाली समितियां तेजी से भूमि माप सुनिश्चित करते हुए कार्यान्वयन की निगरानी करेंगी।

Web Title : Speed Up Land Measurement: Maharashtra Government Approves Trained Surveyors

Web Summary : Maharashtra will appoint trained surveyors and agencies in each district to expedite land measurement. A modern software 'e-measurement 2.0' will be used for accuracy. District collector-led committees will oversee implementation, ensuring faster land measurement and resolving pending cases.