भोगावती : परिते येथील भोगावती साखर कारखान्याने दि. १६ ते ३० नोव्हेंबर अखेर गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली.
उसाचे बिल ३ हजार ६५३ प्रमाणे एकरकमी जमा केल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली. भोगावतीने प्रतिटन ३६५३ रुपये एवढा उच्चांकी दर दिला आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ६६ हजार २६३ मेट्रिक टन उसाच्या बिलापोटी २४ कोटी २० लाख ६०८०२ रुपये उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत.
कारखान्याने ४९ दिवसात २ लाख १७ हजार ७०० मेट्रिक टन ऊस गाळप करून २ लाख ५१ हजार १४० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
साखर उतारा ११.६२ टक्के एवढा आहे. यावेळी सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील व अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा: फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर
