Lokmat Agro >शेतशिवार > कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची शेती; वाचा सविस्तर

कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची शेती; वाचा सविस्तर

Thailand's white jamun farming, which yields high income at low cost; Read in detail | कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची शेती; वाचा सविस्तर

कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची शेती; वाचा सविस्तर

कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या रंगाच्या जांभळाची बाग फुलवली आहे. गोविंद बापू झुरे (रा. कदमवाडी) या शेतकऱ्याने चक्क थायलंड देशातून जांभळाची रोपे आणली आहेत.

कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या रंगाच्या जांभळाची बाग फुलवली आहे. गोविंद बापू झुरे (रा. कदमवाडी) या शेतकऱ्याने चक्क थायलंड देशातून जांभळाची रोपे आणली आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

महेश देसाई
कवठेमहांकाळ : कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या रंगाच्या जांभळाची बाग फुलवली आहे. गोविंद बापू झुरे (रा. कदमवाडी) या शेतकऱ्याने चक्क थायलंड देशातून जांभळाची रोपे आणली आहेत.

थायलंड देशात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या जांभूळ फळाची रोपे आणत त्याची लागवड त्यांनी शेतात केली. आज ३ वर्षांनंतर या झाडांना मोठ्या प्रमाणात जांभूळ लागली होती, परंतु अवकाळीमुळे फटका बसला.

तीन वर्षांपूर्वी झुरे यांनी दीड एकर क्षेत्रात १२ बाय १२ फुटांवर (थायलंड व्हाइट जांभूळ) या जातीच्या पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या ५१० रोपांची लागवड केली.

जांभळाची झाडे मोठी होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी गेला. या जांभळाला २०० ते २५० रुपये प्रति किलो भाव मिळतो. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या जांभूळ लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे, असा सल्लाही झुरे यांनी दिला.

रोपे उपलब्ध करणे. लागवड तंत्रज्ञान माहिती देणे, विक्री व बाजारपेठ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू, असेही झुरे म्हणाले.

या जांभूळ शेतीची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे, मंडल अधिकारी बिपीशन धडस, कृषी सहायक विष्णू शिंदे, अनिल दाहिंजे, स्वेता पंचक्षरी जंगम यांनी केली आहे.

या झाडांना मुळापासून फळ
-
पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या झाडांची उंची कमी असते.
- या झाडांना मुळापासूनच फळ येण्यास सुरुवात होते.
- झाडाची उंची वाढते, तसे फळे येण्याची संख्या वाढते.
- एका झाडाचे आयुष्य २५ वर्षे असते.
- ऊन, वारा, पाऊस, गारपीट याचा कुठलाही फटका या झाडांना बसत नाही.

पांढऱ्या जांभळास मागणी
आयुर्वेदिकदृष्ट्या पांढऱ्या जांभळांचे महत्त्व मोठे आहे. ही जांभळे मधुमेह, किडनी विकार रुग्णांसाठी लाभदायक आहेत. खाण्यास चविष्ट आहे. त्यामुळे बाजारात पांढऱ्या रंगाच्या जांभळाला मागणी वाढत असल्याचे गोविंद झुरे यांनी सांगितले.

अधिक वाचा: आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हॉटस ॲपवर

Web Title: Thailand's white jamun farming, which yields high income at low cost; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.