Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक

सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक

Summer sesame will be profitable this year due to the highest price; An important crop that will arrive in a short period of time | सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक

सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक

वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे.

वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे.

वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे.

उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी लागते. उशिरा पेरणी करणे टाळावे. पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया करावी. तीळ हे कमी दिवसांत येणारे पीक असून, सलग, आंतरपीक व मिश्रपीक म्हणूनही सर्व हंगामात घेता येते.

पिकाला २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून, येणाऱ्या पावसाचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो. तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. उन्हाळी पिकाला किंवा अर्ध-रब्बी पिकाला आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब ओलित करावे. त्यानंतर जमिनीच्या पोतानुसार १२ ते १५ दिवसांनी ओलित करावे.

फुलोऱ्याला सुरुवात होताना व बोंड्या भरताना ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच या काळात संरक्षित ओलित द्यावे. यासोबत झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे, असे मार्गदर्शन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पेरणी हवी

उन्हाळी हंगामातील तिळाच्या पेरणीकरिता ३ ते ४ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यालास बीजप्रक्रिया करावी. पेरणीची वेळ - उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तिळाचे बियाणे बारीक असल्याने त्यात समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख किंवा बारीक माती मिसळून पेरणी करावी.

खत व्यवस्थापन महत्त्वाचे

पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (१२.५ किलो प्रति हेक्टर) व पूर्ण स्फुरद (२५ किलो प्रति हेक्टर) देऊन पेरणीनंतर ३० दिवसांनी उरलेल्या नत्राची (१२.५ किलो प्रति हेक्टर) मात्रा द्यावी. पेरणीवेळी झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास प्रत्येकी २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे, असे कृषी विभागाने सांगितले.

हेही वाचा : भरपूर खनिजे असलेला काटे विरहित निवडुंग ठरतोय गुरांच्या चाऱ्यासाठी फायद्याचा पर्याय; वाचा सविस्तर

Web Title : अधिक दाम से ग्रीष्मकालीन तिल लाभदायक; कम समय में होने वाली फसल।

Web Summary : उष्ण वातावरण और सिंचाई के पानी की उपलब्धता के कारण किसान ग्रीष्मकालीन तिल की बुवाई को प्राथमिकता दे रहे हैं। ऊंचे दाम, ₹13-15 हजार/क्विंटल, लाभ सुनिश्चित करते हैं। फरवरी के तीसरे सप्ताह तक बुवाई करें, बीजों का उपचार करें। यह कम समय की फसल है, जो एकल, अंतर या मिश्रित फसल के रूप में उपयुक्त है। फूल और फली विकास के दौरान नमी सुनिश्चित करें। पत्तियाँ/फलियाँ पीली होने पर कटाई करें। उर्वरक प्रबंधन महत्वपूर्ण है।

Web Title : High prices make summer sesame profitable; short duration crop.

Web Summary : Farmers favor summer sesame due to warm weather and irrigation. High prices, ₹13-15k/quintal, ensure profit. Sow by February's third week, treat seeds. It's a short-term crop, suitable as single, inter, or mixed crop. Ensure moisture during flowering and pod development. Harvest when leaves/pods turn yellow. Fertilizer management is crucial.