आजरा : वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला ३४०० रुपये विनाकपात एकरकमी ऊस दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
आजरा साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू असून आजअखेर १५ दिवसांत ५० हजार मे.टन ऊस गाळप केले. कारखान्याकडे पुरेशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा कार्यरत असून आजरा तालुक्याबरोबर चंदगड, गडहिंग्लज भागातून नियमित ऊस पुरवठा सुरू आहे.
गळितासाठी येणाऱ्या उसाची बिले नियमित देण्याचे आर्थिक नियोजन संचालक मंडळाने जिल्हा बँकेच्या सहकार्याने केलेले आहे. कारखान्याकडे शेतकऱ्यांनी आजरा, गडहिंग्लज, चंदगड व आंबोली क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उसाचे करार केले आहेत.
तसेच करार न केलेल्या शेतकऱ्यांनीही कराराची पूर्तता करून आपण पिकविलेला संपूर्ण ऊस आजरा कारखान्यास गळितासाठी पाठवावा, असेही आवाहन अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केले आहे.
अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर
