Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अहिल्यानगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याचे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

अहिल्यानगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याचे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Sugarcane payment from this sugar factory in Ahilyanagar district is credited to the farmers' accounts | अहिल्यानगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याचे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

अहिल्यानगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याचे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

गाळपास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या बँक खाती या पोटी ७० कोटी रुपये रक्कम जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली.

गाळपास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या बँक खाती या पोटी ७० कोटी रुपये रक्कम जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली.

तिसगाव : वृद्धेश्वर साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे २ हजार ७२३ रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे पेमेंट रक्कम दिली आहे.

गाळपास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या बँक खाती या पोटी ७० कोटी रुपये रक्कम जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. २०२५-२६ हंगामासाठी सहा लाख मे. टन गळिताचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.

कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊसलागवड होण्याचे दृष्टीने कारखाना शेतकी विभाग ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

तसेच कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भातील योजना विचारधीन आहे.

कारखान्याचा आगामी गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी आवश्यक मशिनरी दुरुस्ती व देखभाल आदीचे कामकाज सुरु असल्याची माहिती संचालक राहुल राजळे यांनी दिली.

कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी २०२५-२६ च्या गळीत हंगामामध्ये संपूर्ण ऊस वृद्धेश्वर कारखान्याकडे नोंदणी करावी.

सदरचा ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन उपाध्यक्ष रामकिसन काकडे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा: यंदा सुरु ऊस लागवडीला शेतकऱ्यांची पसंती; आडसालीचे क्षेत्र कशामुळे घटले? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Sugarcane payment from this sugar factory in Ahilyanagar district is credited to the farmers' accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.