कोपार्डे : कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याने हंगाम २०२५-२६ करिता प्रतिटन रुपये ३ हजार ५६० रूपये ऊसदर जाहीर केला आहे.
चालू गळीत हंगामात नोव्हेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
नरके म्हणाले, ३० नोव्हेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या ७५ हजार ९१० मे.टन उसाची एफआरपी ३ हजार ५६० रुपये प्रतिटनप्रमाणे होणारी रुपये २७ कोटी ०२ लाख ४१ हजार रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.
२६ डिसेंबर २०२५ अखेर कारखान्याने २ लाख ९ हजार ५० मे. टन ऊस गळीत करून २ लाख ३७ हजार ७६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले असून, सरासरी साखर उतारा ११.६१ टक्के आहे.
यावेळी कुंभी-कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, सर्व संचालक मंडळ, सदस्य, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील आणि कामगार प्रतिनिधी नामदेव पाटील, अतुल नाळे, संजय आडनाईक, आदी उपस्थित होते.
अधिक वाचा: 'किसान सन्मान'चा हप्ता कोणाकोणाला? राज्य शासनाचे वाढीव तीन हजार कधी मिळणार?
