सोलापूर : मागील वर्षीच्या गाळपावर मुख्यमंत्री निधी व पूरग्रस्त निधी प्रत्येकी पाच रुपये व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीचे तीन रुपये भरलेल्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाने दिले आहेत.
दरम्यान सिद्धेश्वर, गोकुळ व जयहिंद कारखान्यांनी एफआरपी न दिल्याने गाळप परवाने अर्ज साखर आयुक्त कार्यालयाने परत पाठविले आहेत.
जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले आहेत. मातोश्री लक्ष्मी शुगर व इतर दोन साखर कारखान्यांनी अद्याप गाळप परवान्यासाठी अर्ज केले नाहीत.
शासनाने मागील गाळपावर प्रतिटन पाच रुपये पूरग्रस्त निधी, पाच रुपये मुख्यमंत्री सहायता निधी व स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळ तीन रुपये निधी भरणा करणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यास सुरुवात केली आहे.
ही रक्कम भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शंकर अकलूज, श्री. पांडुरंग श्रीपूर, सासवड माळी शुगर व धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील एक अशा चार साखर कारखान्यांना शुक्रवारी रात्री गाळप परवाना दिला आहे.
मागील गाळपाची एफआरपी दिली नसल्याने सिद्धेश्वर सोलापूर, गोकुळ व जयहिंद या साखर कारखान्यांचे गाळप परवाना अर्ज साखर आयुक्त कार्यालयाने परत पाठविले आहेत.
अधिक वाचा: सीमेपलीकडे कर्नाटकातील 'हा' साखर कारखाना उसाला देतोय तब्बल ४,३३९ रुपये दर; वाचा सविस्तर
