Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान या योजनेत झाल्या सुधारणा वाचा सविस्तर

विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान या योजनेत झाल्या सुधारणा वाचा सविस्तर

subsidy for wells, farm pond, electricity connection read details about the change financial assistance in the scheme | विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान या योजनेत झाल्या सुधारणा वाचा सविस्तर

विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान या योजनेत झाल्या सुधारणा वाचा सविस्तर

Birasa Munda Krishi Kranti Yojna बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Birasa Munda Krishi Kranti Yojna बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस ४ लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस १ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते.

इनवेल बोअरिंगसाठी आता ४० हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी ५० हजार रुपये आणि परसबागेकरिता ५ हजार देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मिटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या १ लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल.

त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या २५ हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच ४७ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल.

अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना ९७ हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. याशिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Web Title: subsidy for wells, farm pond, electricity connection read details about the change financial assistance in the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.