Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > बीडमधील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा

बीडमधील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा

Soybean, Moong and Udi farmers in Beed will get advance crop insurance | बीडमधील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा

बीडमधील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा

बीड जिल्ह्यातील सोयाबीन मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना आता एक महिन्याच्या आत २५ टक्के प्रमाणे अग्रीम पीक विमा देण्याचा ...

बीड जिल्ह्यातील सोयाबीन मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना आता एक महिन्याच्या आत २५ टक्के प्रमाणे अग्रीम पीक विमा देण्याचा ...

बीड जिल्ह्यातील सोयाबीन मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना आता एक महिन्याच्या आत २५ टक्के प्रमाणे अग्रीम पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळांमध्ये सोयाबीन, मूग व उडीद या प्रमुख तीन पिकांचे 50% हून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे 87 महसुली मंडळात अग्रीमपीक विमा मंजूर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार प्रशासनाने अधिसूचना जारी केली असून एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळणार आहे.

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी अधिसूचना काढली असून बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे. त्यामुळे पिक विमा कंपन्यांकडून तातडीने शेतकऱ्यांना 25% रक्कम अग्रीम स्वरूपात मिळणार आहे.

कधी मिळतो अग्रीम पिक विमा?

तुमच्या मंडळात जर 21 दिवसांपेक्षा अधिक खंड पडला असेल आणि पीक विमा समितीच्या सर्वेक्षणात त्या महसूल मंडळात घट आहे असे समोर येत असेल तर विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्याला मिळू शकते. त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पीक विमा समिती जिल्ह्यातील पिकाचे सर्वेक्षण करते. जर त्या मंडळातील उत्पादन 50% पेक्षा कमी असेल असा अहवाल या समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिला तर जिल्हाधिकारी त्या मंडळातील शेतकऱ्यांना आगरी व विमा भरपाईसाठी अधिसूचना काढू शकतात.

Web Title: Soybean, Moong and Udi farmers in Beed will get advance crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.