यंदाच्या रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून, ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भुईमूगासाठी ३१ मार्च २०२६ अशी मुदत ठेवण्यात आली आहे. या मुदतीत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी-फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे आवश्यक असून, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गहू अहिल्यानगर जिल्हा (बागायत) विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रूपये (विमा हप्ता ४५० रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा-३६ हजार रुपये (३६० रुपये), पुणे जिल्हा गहू (बागायत) ४५ हजार रुपये (२२५ रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत ३६ हजार रुपये (१८० रुपये), हरभरा- ३६ हजार रुपये (९० रुपये) याप्रमाणे विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता राहिल.
सोलापूर जिल्हा - गहू (बागायत) विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये (विमा हप्ता ३८० रुपये), रब्बी ज्वारी बागायत ३६ हजार रुपये (३६० रुपये), रब्बी ज्वारी ३० हजार (३०० रूपये).
