शिरोळ : येथील श्री दत्त साखर कारखान्यास २ ते १५ नोव्हेंबर अखेर ७५,२४०.९० मेट्रिक टन इतका ऊस गाळपास उपलब्ध झाला होता.
या उसास संस्थेने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे एकरकमी विनाकपात प्रतिटन ३,४५० रुपयेप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलीआहे.
यात एकूण २५ कोटी ९५ लाख ८१ हजार १६० रुपये इतकी रक्कम ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी दिली.
कारखान्याने ही रक्कम जमा करून ऊस दराबाबतची विश्वासार्हता जोपासली आहे. कारखान्याचे गाळप अतिशय चांगल्या पद्धतीने व क्षमतेने चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप केला जाणार आहे.
तेव्हा शेतकऱ्यांनी पिकवलेला व कारखान्याकडे नोंद दिलेला सर्व ऊस गाळपास उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी 'दत्त'चे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा: महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज
