Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; वाचा माउलींचा कोणत्या गावात कधी मुक्काम?

आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; वाचा माउलींचा कोणत्या गावात कधी मुक्काम?

Schedule of Ashadhi Wari Palkhi ceremony announced; Read: In which village will the Mauli stay when? | आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; वाचा माउलींचा कोणत्या गावात कधी मुक्काम?

आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; वाचा माउलींचा कोणत्या गावात कधी मुक्काम?

2026 Sant Dnyaneshwar Mauli Palkhi श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे.

2026 Sant Dnyaneshwar Mauli Palkhi श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे.

Pandharpur Ashadhi Wari 2026 Timetable श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे.

प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांची लेखी हमी दिल्यानंतर यंदाही पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरातच होणार असल्याचे संस्थान कमिटीने स्पष्ट केले.

वारकऱ्यांची वाढती संख्या, अपुरी जागा आणि भाविकांना होणाऱ्या गैरसोयीमुळे पालखी मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवण्याची चर्चा रंगली होती, मात्र, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांना दिलेल्या लेखी पत्रानंतर हा पेच सुटला.

२५ मे २०२६ रोजी दिलेल्या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी शेजारील तीन खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद केले आहे.

८ जुलैला आळंदीतून प्रस्थान
यंदाचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. २ आणि १० जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेत होणार आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०२६

दिनांकवारसकाळी पालखी निघण्याचे ठिकाणसकाळचा विसावादुपारचा भोजन विसावा व निघण्याचे ठिकाणदुपारचा विसावारात्रीचा मुक्काम
८ जुलैबुधवार---------------प्रस्थान दुपारी ३:०० वा.(गांधी वाडा) दर्शन मंडप इमारत, आळंदी संस्थान
९ जुलैगुरुवारआळंदीथोरल्या पादुका आरती, भोसरी फाटाफुलेनगरसंगमवाडीभवानी पेठ, पुणे
१० जुलैशुक्रवार--------------------पुणे
११ जुलैशनिवारपुणेशिंदे छत्री-आरतीहडपसरउरळी देवाची, वडकीनाला झेंडेवाडी, पवारवाडीसासवड
१२ जुलैरविवार----------सासवड-----सासवड
१३ जुलैसोमवारसासवडबोरावके मळायमाई-शिवरीसाकुर्डेजेजुरी
१४ जुलैमंगळवारजेजुरीदौंडज शीव, दौंडजवाल्हे-----वाल्हे
१५ जुलैबुधवारवाल्हेपिंपर खुर्द विहीरनीराश्रींचे नीरा स्नानलोणंद
१६ जुलैगुरुवार----------लोणंदचांदोबाचा लिंब उभे रिंगण १ लेतरडगाव
१७ जुलैशुक्रवारतरडगावदत्त मंदिर कळज, सुरवडीनिंभोरे ओढावडजलफलटण
१८ जुलैशनिवारफलटणविडणीपिंपरदनिंबळक फाटाबरड
१९ जुलैरविवारबरडसाधुबुवाचा ओढाधर्मपुरी कॅनॉल, कारुंडेशिंगणापूर फाटा पानसकरवाडीनातेपुते
२० जुलैसोमवारनातेपुते-----मांडवी ओढापुरंदवडे गोल रिंगण १ ले, येळीवमाळशिरस
२१ जुलैमंगळवारमाळशिरसखुडूसफाटा गोल रिंगण २ रेविंझोरी चौक, ज्ञानेश्वरनगरधावाबावी माउंटवेळापूर
२२ जुलैबुधवारवेळापूरठाकूरबुवाची समाधी गोल रिंगण ३ रेतोंडले-बोंडलेटप्पा संत सोपानदेव भेट, वाडीकुरोलीभंडीशेगाव
२३ जुलैगुरुवार-----भंडीशेगावभंडीशेगावबाजीरावची विहीर उभे रिंगण २ रे, गोल रिंगण ४ थेवाखरी
२४ जुलैशुक्रवार---------------पादुकांजवळ आरती व उभे रिंगण ३ रेपंढरपूर
२५ जुलैशनिवार-----नगरप्रदक्षिणाश्रींचे चंद्रभागा स्नान-----पंढरपूर
२६ जुलैरविवार--------------------पंढरपूर
२७ जुलैसोमवार--------------------पंढरपूर
२८ जुलैमंगळवार--------------------पंढरपूर
२९ जुलैबुधवार-----श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व श्री विठ्ठल-रुक्मिणी भेट-----पादुकांजवळ विसावावाखरी परतीचा प्रवास सुरू

अधिक वाचा: सोने आणि चांदीवरील आयात शुल्क गेले थेट १५ टक्क्यांवर; भविष्यात सोने किती हजारांवर जाणार?

Web Title : आषाढ़ी वारी पालखी शेड्यूल घोषित: जानिए, माउली किस गांव में कब ठहरेंगे?

Web Summary : आषाढ़ी वारी पालखी 2026 का शेड्यूल जारी हो गया है। जुलूस 8 जुलाई को आलंदी से शुरू होगा, पुणे में भवानी पेठ में प्रवास की पुष्टि हुई है। विस्तृत यात्रा कार्यक्रम 24 जुलाई से शुरू होकर पंढरपुर तक गांव-वार पड़ाव बताता है।

Web Title : Ashadhi Wari Palkhi Schedule Announced: Mauli's Stay in Which Village?

Web Summary : The 2026 Ashadhi Wari Palkhi schedule is out. The procession starts from Alandi on July 8th, with a Pune stay confirmed at Bhavani Peth. The detailed itinerary reveals village-wise stops until Pandharpur, commencing July 24th.