सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामातील १ ते १५ डिसेंबर या कालावधीतील प्रतिटनाला रु. ३४०० प्रमाणे ऊस बिले जमा केली आहेत.
तोडग्यानुसार १०० रुपये गळीत हंगाम समाप्तीनंतर दिले जाणार आहे. दरम्यान, १६ ते ३० नोव्हेंबर या पंधरवड्यातील तोडणी वाहतूक बिलेही अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आज अखेर ३,८१, ७७५ मेट्रिक टन इतके गाळप केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा १३.४० टक्के आहे व सरासरी ११.८९ टक्के आहे.
३० नोव्हेंबरअखेर एकूण २,०४,८१० मेट्रिक टनांची ऊस बिले यापूर्वीच अदा झालेली आहेत. अशाप्रकारे आजअखेर ३,०१,३०५ मेट्रिक टनांची ऊस बिले अदा झालेली आहेत.
अधिक वाचा: देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेला 'हा' साखर कारखाना राज्यातही ठरला सर्वोत्तम
