नवी दिल्ली : भारताने चालू आर्थिक वर्षात आठ एप्रिलपर्यंत २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केला आहे. यामध्ये सर्वाधिक ५१,५९६ टन साखर सोमालियाला पाठवण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली.
कोणत्या देशात किती निर्यात?
सोमालिया - ५१,५९६ टन
अफगाणिस्तान - ४८,८६४ टन
श्रीलंका - ४६,७५७ टन
लिबिया - ३०,७२९ टन
जिबूती - २७,०६४ टन
संयुक्त अरब अमिराती - २१,८२४ टन
टांझानिया - २१,१४१ टन
बांगलादेश - ५,५८८९ टन
चीन - ५,४२७ टन
एआयएसटीए ने सांगितले की, भारतातून साखरेची निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याचा परिणाम साखरेच्या किमतींवर दिसून यावा, कारण इथेनॉल हे वाहतूक इंधनात एक प्रमुख घटक आहे.
अधिक वाचा: उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा