Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्याच्या 'या' जिल्ह्यासाठी पीक विम्याचे ११८ कोटी रुपये मंजूर; वाचा सविस्तर

राज्याच्या 'या' जिल्ह्यासाठी पीक विम्याचे ११८ कोटी रुपये मंजूर; वाचा सविस्तर

Rs 118 crore approved for crop insurance for 'this' district of the state; Read in detail | राज्याच्या 'या' जिल्ह्यासाठी पीक विम्याचे ११८ कोटी रुपये मंजूर; वाचा सविस्तर

राज्याच्या 'या' जिल्ह्यासाठी पीक विम्याचे ११८ कोटी रुपये मंजूर; वाचा सविस्तर

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२५ च्या खरीप हंगामातील पिकांसाठी ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२५ च्या खरीप हंगामातील पिकांसाठी ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२५ च्या खरीप हंगामातील पिकांसाठी ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील सुमारे २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. त्यानुसार २.३९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता.

पीक विमा योजनेत अधिसूचित केलेल्या पिकांचे दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग आदी कारणांनी नुकसान झाल्यास पीक कापणी प्रयोगावर आधारित येणाऱ्या उत्पन्नानुसार नुकसानभरपाई देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

कापूस व कांदा पिकांबाबत पाठपुरावा

काही तालुक्यांतील भरपाईबाबतची परिगणना अद्याप प्रगतिपथावर आहे. कापूस व कांदा पिकांच्या नुकसान भरपाईबाबत प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

तालुकानिहाय विमा रक्कम

नगर - ५ कोटी ३ लाख.
अकोले - १ कोटी १७ लाख.
जामखेड - १७ कोटी ७१ लाख.
कर्जत - ८९ हजार.
कोपरगाव -९ कोटी ६६ लाख.
नेवासा - २२ कोटी ६८ लाख.
पारनेर - २१ कोटी ७२ लाख.
पाथर्डी - १ कोटी ४० लाख.
राहाता - १३ कोटी ९२ लाख.
राहुरी - ६ कोटी २४ लाख.
शेवगाव - १ कोटी ७ लाख.
श्रीरामपूर - १७ कोटी ९६ लाख.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

Web Title : महाराष्ट्र के इस जिले के लिए 118 करोड़ रुपये का फसल बीमा मंजूर

Web Summary : अहमदनगर के किसानों के लिए खरीफ 2025 के लिए पीएमएफबीवाई के तहत 118.63 करोड़ रुपये का फसल बीमा मंजूर किया गया। लगभग 2.23 लाख किसानों ने 2.39 लाख हेक्टेयर का बीमा कराया था। सूखा, प्राकृतिक आपदाओं, कीटों और बीमारियों के कारण फसल कटाई प्रयोगों के आधार पर मुआवजा दिया जाएगा। कपास और प्याज के मुआवजे के लिए अनुवर्ती कार्रवाई जारी है।

Web Title : ₹118 Crore Crop Insurance Approved for This Maharashtra District

Web Summary : ₹118.63 crore crop insurance approved for Ahmednagar farmers under PMFBY for Kharif 2025. Around 2.23 lakh farmers had insured 2.39 lakh hectares. Compensation will be given based on crop cutting experiments due to drought, natural calamities, pests, and diseases. Follow-up continues for cotton and onion compensation.