Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर

पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर

Rs 10,000 help to flood affected farmers - Deputy Chief Minister Ajit Pawar | पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर

पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच पुरात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदत राज्य सरकार देणार आहे.

शेती पिकांचे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करून बाधित भागातील व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून  करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. 

विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा व इतर जिल्ह्यांना पुराने वेढा घातल्याचे चित्र होते. नदी नाल्यांना पूर आल्याने तसेच शेतात पाणी साठल्याने  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाकरिता 513 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. इ केवायसी केल्यानंतर सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची घोषणाही त्यांनी पावसाळी अधिवेशनात केली.  

अतिवृष्टीत दुकानांच्या झालेल्या नुकसानासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून अधिकृत दुकानांसाठी नुकसानाच्या प्रमाणात 50 हजार रुपयांचा मर्यादित व टपरीचे नुकसान झाल्यास नुकसानाच्या प्रमाणात दहा हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Rs 10,000 help to flood affected farmers - Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.