अहिल्यानगर : सप्टेंबर २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार ५०६ कोटी ४१ लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे.
जिल्ह्यातील एकूण ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ५ लाख ४० हजार ७५६ शेतकऱ्यांना १ हजार २ कोटी २७ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
अद्याप ८५ हजार ५२८ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान जमा होऊ शकलेले नाही. अहिल्यानगर तालुक्यात ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५५ लाख रुपये मिळाले असून, ४ हजार ८४९ शेतकरी ई-केवायसीशिवाय आहेत.
अकोलेमध्ये १ हजार ८९ शेतकऱ्यांना ७८ लाख रुपये वितरित झाले असून, ३ हजार ८९९ प्रलंबित आहेत. जामखेडमध्ये ३२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ६० कोटी २२ लाख रुपये मदत मिळाली असून, ३ हजार ९५८ जणांचे ई-केवायसी बाकी आहे.
कर्जत तालुक्यात ४९ हजार ७८६ शेतकऱ्यांना १०२ कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले असून, ९ हजार ४०७शेतकरी प्रलंबित आहेत. कोपरगावमध्ये ३२ हजार ६९८ शेतकऱ्यांना ४८ कोटी ६० लाख रुपये मिळाले असून, ६ हजार १४ शेतकरी ई-केवायसी न करता आहेत.
नेवासा तालुक्यात ७१ हजार ६२२ शेतकऱ्यांना १४६ कोटी ७८ लाख रुपये वितरित झाले असून, आठ हजार ७४१ प्रलंबित आहेत. पारनेरमध्ये ३७ हजार ५६४ शेतकऱ्यांना ५९ कोटी ६३ लाख रुपये मिळाले असून, २ हजार ४७० जणांचे ई-केवायसी बाकी आहे.
पाथर्डी तालुक्यात ५१ हजार ९६४ शेतकऱ्यांना १०१ कोटी ६६ लाख रुपये मदत मिळाली असून, ११ हजार ५१९ शेतकरी ई-केवायसीशिवाय आहेत.
राहाता तालुक्यात ३२ हजार ९५२ शेतकऱ्यांना ६० कोटी ८२ लाख रुपये वितरित झाले असून, ५ हजार ९७प्रलंबित आहेत. राहुरीमध्ये ४६ हजार १५३ शेतकऱ्यांना ८१ कोटी ७६ लाख रुपये मिळाले असून, ४ हजार ४१० शेतकरी बाकी आहेत.
संगमनेरमध्ये १८ हजार ९७९ शेतकऱ्यांना २७ कोटी १८ लाख रुपये मिळाले असून, ३ हजार १०३ जणांचे ई-केवायसी अपूर्ण आहे. शेवगावमध्ये ५० हजार ४६० शेतकऱ्यांना ११० कोटी ८६ लाख रुपये वितरित झाले असून, ८ हजार ५७१ शेतकरी अपूर्ण आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात ४६ हजार ७१६ शेतकऱ्यांना ७५ कोटी ३२ लाख रुपये मिळाले असून, १० हजार २९५ प्रलंबित आहेत. श्रीरामपूरमध्ये २८ हजार ६१८ शेतकऱ्यांना ५१ कोटी ३६ लाख रुपये मदत मिळाली असून, ३ हजार १९५ शेतकरी ई-केवायसीशिवाय आहेत.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावे तसेच पुढील कालावधीत राज्यामध्ये ई-पंचनामा प्रणाली लागू होणार असल्याने अॅग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी. - दादासाहेब गिते, निवासी उपजिल्हाधिकारी
अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर
