Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रोहयोच्या कामाला आली गती; बेरोजगारांच्या हाताला रोजगार

रोहयोच्या कामाला आली गती; बेरोजगारांच्या हाताला रोजगार

Rohyo's work gained momentum; Employment for the unemployed | रोहयोच्या कामाला आली गती; बेरोजगारांच्या हाताला रोजगार

रोहयोच्या कामाला आली गती; बेरोजगारांच्या हाताला रोजगार

पातूर तालुक्यातील चित्र : २४०० च्या जवळपास मजूर कामाला

पातूर तालुक्यातील चित्र : २४०० च्या जवळपास मजूर कामाला

देवानंद गहिले

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत ९५ गावे येत असून, ५७ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम प्रगतिपथावर सुरू झाल्याने जवळपास २४०० च्या जवळपास मजुरांना या योजनेतून काम मिळाले आहे.

पातूर तालुक्यात एमआयडीसी एरिया आरक्षित आहे. मात्र, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने या औद्योगिकीकरणासाठी उपलब्ध झालेल्या जमिनीचा उपयोग झाला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रस्तावित एमआयडीसीची योजना धुळखात पडून आहे. सातत्याने निवडणुकी येतात जातात. मात्र, तालुक्यातील बेरोजगारांचा प्रश्न कायम आहे. किरकोळ धंद्यावर येथील बेरोजगार युवकांना रोजगार करावा लागते.

त्यामुळे अनेक मजुरांनी पातूर पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे जॉबकार्डची नोंदणी केली आहे. आपल्याला रोजगार मिळेल, या अपेक्षित हे मजूर असतात. मात्र, अनेक दिवसांपासून या योजनेमध्ये काम नव्हते. आता रोजगार हमी योजनेचे काम प्रगतिपथावर सुरू झाले आहे.

या भागात वृक्षलागवड

वृक्ष लागवड, सिंचन विहीर, आदी कामात सुरू आहे. यासोबत शेत रस्ते वृक्षलागवड कामामुळेसुद्धा अनेक मजुरांना काम मिळाले आहे. यामध्ये चतारी, चान्नी, शिर्ला, बोडखा, मलकापूर, भानोस या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली असून, त्याचे संगोपन केले आहे.

विहिरींच्या कामाची केली होती पाहणी

• गतवर्षात तालुक्यात एकूण ९७ सिंचन विहिरीला मंजुरात होती. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील टक्केवारीनुसार सुरू कामांमध्ये सर्वाधिक एकूण ८० विहिरींचे काम पातूर तालुक्यात प्रगतिपथावर आहे.

• या कामाची गुणवत्ता व मजुरांची उपस्थिती पाहून जिल्हाधिकारी अजित कुंभार तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी बी. वैष्णवी यांनी नुकतीच पातूर तालुक्यात १४ मे रोजी आढावा घेऊन पाहणी केली.

रोजगार हमी योजनेच्या कामाला गती मिळाल्याने अनेक बेरोजगार जॉब कार्डधारकांना त्यांच्या हाताला काम मिळाले आहे हे चांगली बाब आहे अधिकाऱ्यांनीसुद्धा पाहणी केली. परंतु, इतर ५६ कोटींच्या विहीर निधीला प्रशासकीय मंजुरात मिळाली असताना वर्क ऑर्डर मिळाल्या. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. या कामाला सुद्धा सुरुवात होणे गरजेचे आहे. - अॅड. सूरज झडपे, पंचायत समिती सदस्य, पातूर

हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत

Web Title: Rohyo's work gained momentum; Employment for the unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.