Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

Recruitment for 903 posts in Land Records Department; Know the eligibility and application process in detail | भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

bhukarmapak bharti भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील (गट क) ९०३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.

bhukarmapak bharti भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील (गट क) ९०३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे: भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील (गट क) ९०३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून, २४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.

यात पुणे विभागात ८३ पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून, त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

कोणत्या विभागात किती जागा?
पुणे - ८३ पदे
कोकण (मुंबई) - २५
नाशिक - १२४
संभाजीनगर - २१०
अमरावती - ११७
नागपूर - ११० पदांचा समावेश आहे.

परीक्षेसाठीची पात्रता मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग) किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.

परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी करून विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिवसे यांनी दिली.

उमेदवारांनी https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ या संकेतस्थळांवर ऑनलाइनरित्या अर्ज करावेत. या पदांसाठी १३ व १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.

अधिक वाचा: सातबारावरून मयत खातेदाराचे नाव कमी करण्यासाठी कसा कराल अर्ज? वाचा सविस्तर

Web Title : भूमि अभिलेख विभाग भर्ती: 903 रिक्तियां, आवेदन विवरण यहां

Web Summary : भूमि अभिलेख विभाग 903 सर्वेक्षक पदों के लिए भर्ती कर रहा है। 24 अक्टूबर तक ऑनलाइन आवेदन करें। पुणे में 83 पद हैं। सिविल इंजीनियरिंग में डिप्लोमा या सर्वेक्षक प्रमाण पत्र आवश्यक है। ऑनलाइन परीक्षा 13 और 14 नवंबर को है।

Web Title : Land Records Department Recruitment: 903 Vacancies, Application Details Here

Web Summary : The Land Records Department is recruiting for 903 surveyor positions. Apply online by October 24th. Pune has 83 openings. A diploma in civil engineering or surveyor certificate is required. The online exam is November 13th and 14th.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.