मुंबई : महाडीबीटी पोर्टवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख ६७ हजार २२५ लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
कृषी यंत्र/औजारांवरील जीएसटीच्या दरामध्ये घट (५ टक्के) करण्यात आलेली असून अनुदानाबरोबर त्याचा देखील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
याबाबतीत कृषी यंत्रे औजारे उत्पादक व विक्रेते यांनी गैरप्रकार केलेला आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
आजपर्यंतच्या कार्यकाळात एका वर्षात जास्तीत जास्त सात लाख लाभार्थ्यांची निवड झाली आहे. परंतु, पहिल्यांदाच ३२ लाखांहून अधिक लाभार्थी निवडले गेले.
अधिक वाचा: आता खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द कायम होणार; काय आहे निर्णय? जाणून घ्या सविस्तर