Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Groundnut Production सिमेंटच्या जंगलात भुईमूग उत्पादनाचा विक्रमी उच्चांक

Groundnut Production सिमेंटच्या जंगलात भुईमूग उत्पादनाचा विक्रमी उच्चांक

Record high groundnut production in cement forest urban kharghar area farming | Groundnut Production सिमेंटच्या जंगलात भुईमूग उत्पादनाचा विक्रमी उच्चांक

Groundnut Production सिमेंटच्या जंगलात भुईमूग उत्पादनाचा विक्रमी उच्चांक

खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानने भुईमुगाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेती म्हणून कोकण कृषी विकास प्रतिष्ठान दरवर्षी विविध प्रयोग शेतीत करीत असते.

खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानने भुईमुगाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेती म्हणून कोकण कृषी विकास प्रतिष्ठान दरवर्षी विविध प्रयोग शेतीत करीत असते.

पनवेल : खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानने भुईमुगाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेती म्हणून कोकण कृषी विकास प्रतिष्ठान दरवर्षी विविध प्रयोग शेतीत करीत असते.

या न्यासाच्या स्थापनेपासून कृषीविषयक विविध क्षेत्रात काम करून कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग व सुधारित वाणांची लागवड करून उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व कृषीप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम केले जाते.

२०२४-२५ या वर्षी उन्हाळी हंगामात भुईमूग प्रचलित सुधारित वाण व सुधारित मशागत पद्धतीचा उपयोग करून प्रति एकर २० क्विंटल विक्रमी उत्पन्न मिळाले.

खारघरमधील या प्रात्यक्षिक प्रयोगामध्ये भाभा परमाणू संशोधन केंद्र येथून भुईमूग पिकात संशोधन केलेले डॉ. प्रेम काळे यांच्या मार्गदर्शनात हा प्रयोग राबविण्यात आला.

काळे यांनी आतापर्यंत भुईमुगाचे बरेच वाण विकसित केलेले असून त्यांची लागवड बहुतांश शेतकरी करीत आहेत. गेली दोन वर्षे ते कृषी विकास प्रतिष्ठान, खारघर येथे विविध संशोधनात्मक भुईमुगावर ते काम करत आहेत.

कोकण कृषी विकास प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक शेखर सावंत तसेच प्रतिष्ठानचे संशोधन प्रमुख श्रीकृष्ण सावंत व पर्यवेक्षक उमेश दळवी यांच्या देखरेखीखाली प्रतिष्ठानचे विविध प्रयोग चालू आहेत.

प्रयोग राबविला यशस्वीपणे
• भुईमूग वाणामध्ये उत्पादन क्षमता अधिक, पक्च काळ लवकर किंवा मध्यम, दाण्याचा उतारा चांगला, शेंगदाण्यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक व रोगप्रतिकार क्षमता अधिक असणे महत्त्वाचे आहे.
• बियाण्यांची शुद्धता म्हणजे भेसळमुक्त, बियाणे शुद्ध व उगवण क्षमता अधिक असणे महत्त्वाचे असते.
• उगवण कमी झाल्यास झाडांची संख्या कमी राहते व एकूण उत्पन्न कमी मिळते या सर्व गोष्टी विचारात घेऊन खारघर शहरातील भुईमुगाचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे.

अधिक वाचा: Kokum Cultivation आरोग्यदायी 'कोकम' पिकाची लागवड कशी केली जाते?

Web Title: Record high groundnut production in cement forest urban kharghar area farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.