गणरायाच्या आगमनाबरोबरच मराठवाडयात काही जिल्हयात पावसाने हाजेरी लावली. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून आलेल्या पावसाने मराठवाडयाला चांगलेच झोडपून काढले आहे. परंतू गेल्या दोन दिवसांपासून विश्रंती घेतलेल्या पावसाने आज(७ सप्टेंबर) रोजी परत एकदा सुरूवात केली आहे.
त्यामुळे येथील धरणाच्यापाणी साठयात चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच आज (७ सप्टेंबर) रोजी इसापूर धरणाच्या सांडव्याची ३ वक्रव्दारे १० सेंटीमीटर ने उघडण्यात आली आहेत.
त्यामुळे पैनगंगा नदीपात्रात १०२१ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
इसापूर धरणाची पाणी पातळी ४४०.७३ मी. झाली असून उपयुक्त पाणीसाठा ९३८.३१ दलघमी (९७.३२ टक्के) इतका झाला आहे. तसेच इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जयपूर बंधा-यातून ६५९८ क्युसेक्स इतका विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे.
धरणाची पाणी पातळी ४४०.७४ मी ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणाच्या सांडव्याची ३ वक्रव्दारे १० सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात १०२१ क्यूसेक्स (२८.९२ क्युमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे पैनगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरीकांना आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याविषयी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग यांना आपले स्तरावरुन सुचना देण्याचे आवाहन अ बा जगताप, कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पविभाग क्र.१ नांदेड यांनी केले आहे.
