Join us

Ranbhajya : जीवनसत्वाचा खजिना असणाऱ्या 'या' रानभाज्या खा अन् आजारापासून दूर रहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:54 IST

Top Ranbhajya सफरचंद हे गरिबांना परवडणारे नाही. ते महाराष्ट्रात पीकतही नाही. म्हणून आजारांपासून दूर राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बांध, शेत, आणि माळावर सहज मिळणाऱ्या चार रानभाज्या मानवाला निसर्गानं दिलेली संजीवनी आहे.

सफरचंद हे गरिबांना परवडणारे नाही. ते महाराष्ट्रात पीकतही नाही. म्हणून आजारांपासून दूर राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बांध, शेत, आणि माळावर सहज मिळणाऱ्या चार रानभाज्या मानवाला निसर्गानं दिलेली संजीवनी आहे.

आपल्या गावात कुरहू, तांदूळजा, पाथरी, फांदभाजी बांध, शेत आणि माळावर दिसते. या भाज्या शहरी आणि ग्रामीण भागातील बहुतेकांना ओळखता येतात.

दरवर्षी पावसाळ्यात या सर्वत्र सहज उपलब्ध होतात. मोठी शहरे वगळता त्या मुबलक प्रमाणात असल्याने विनामूल्य मिळतात, तर मोठ्या शहरात दहा वीस रुपयांत मिळतात.

पावसाळा सुरु झाल्यावर रानभाज्यांचा हंगाम सुरु झाला. या दिवसात बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांची रेलचेल दिसून येते.

भाज्या व गुणधर्म१) फांद/फांग भाजीबांध, माळावर सपाट किंवा झुडपांवर वाढतात जुलै, ऑगस्ट दरम्यान चवदार लागतात. यात खनिजे, फॉस्फरस, तंतुमय घटक मोठ्या प्रमाणात असल्याने, भूक लागते, पोट साफ पित्तशामक असतात२) तांदुळजाही भाजी क जीवनसत्वाचा मोठा खजिना आहे. त्वचा उजळते, तापात उपयुक्त, विष नाशक, मुळव्याधावर गुणकारी, यकृत मजबूत करते. दारूच्या व्यसनी लोकांना महत्त्वाचे औषध आहे.३) पाथरीकमी पर्जन्यमान असलेल्या पठारावर, माळरानावर सर्वत्र उपलब्ध, करडईच्या पानासारखी दिसते. कफनाशक, स्तनदा मातांना, अशक्त व्यक्तींना उपयोग.४) कुरडूपित्तशामक, पाचक, त्वचा विकार, चरबी कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग. मुतखडा या आजारावर गुणकारी. सलग आठ दहा दिवस जेवणात वाटीभर असल्यास मुतखडा विरघळवते. खाल्ल्याने लघवी जास्त प्रमाणात होते. किडनी साफ करते.

५० प्रकारच्या रानभाज्यायामध्ये कर्टुले, लाल माठ, चियळ, राजगीरा, टाकळा, कुई, भेंडी (रानभेंडी), घेवडा, शेवगा फूल, अळंबी, आघाडा, रानतोंडले, महाळुंग, घोळ, गुळवेल, अंबाडी, तांदुळ कुंद्रा, पाथी अशा ५० पेक्षा अधिक प्रकारच्या रानभाज्या बाजारात विक्रीला येतात. पण, यंदा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारात अशा रानभाज्यांची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे.

औषधी गुणधर्म, १०० टक्के सेंद्रिय संकररहित असल्याने खनिजे, विविध प्रकारचे रोधके असतात. पाचक आणि पौष्टिक आहेत. तंतुमय पदार्थ असलेल्या या भाज्या आहारात असल्यास मूळव्याधीचे आजार होत नाहीत.

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावरील 'ह्या' नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडीग राहणार नाही

टॅग्स :भाज्याजंगलमोसमी पाऊसपाऊसआरोग्यहेल्थ टिप्सबाजार