नेहमीच्या जेवणातील बहुतांश भाज्यांच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. दर परवडत नसल्यामुळे ग्राहकांचा सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रानभाज्या खरेदीसाठी प्रतिसाद वाढला आहे.
विविध जीवनसत्व, प्रोटिन्स, लोह, कॅल्शियम युक्त एकूण भरपूर आरोग्यवर्धक गुणधर्म असलेल्या रानभाज्यांसाठी मागणी वाढली आहे.
रानभाज्या हंगामी असून खते, कीटकनाशकांशिवाय त्यांची वाढ होत असल्यामुळे नैसर्गिक गुणधर्मानी युक्त भाज्यांची आवर्जून खरेदी केली जात आहे.
सध्या श्रावण सुरू आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी आहे, परंतु अन्य भाज्यांच्या दरवाढीमुळे ग्राहक विशेषतः रानभाज्यांचीच खरेदी करत आहेत.
टाकळा, फोडशी, कर्टुली, भारंगी, कुडाच्या शेंगा, अळू, आघाडा, शेवगा, अंबाडी, अळंबी विक्रीसाठी येत आहेत. भरपूर पोषण गुणधर्मानी युक्त तसेच दरही कमी असल्याने ग्राहकांना सध्या तरी या भाज्यांची खरेदी परवडत आहे.
ग्रामीण भागातून विक्रेते रानभाज्या शहरात विक्रीसाठी आणत आहेत. सकाळच्या सत्रात रानभाज्यांची हातोहात विक्री होत आहे.
चवीलाच नाही तर आरोग्यासाठी गुणकारी
◼️ पावसाळ्यात रानभाज्या नैसर्गिक उगवतात.
◼️ या भाज्या केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात.
◼️ पोषण गुणधर्मानी युक्त भाज्यांचे दरही परवडणारे आहेत. १० ते १५ रूपये जुडी दराने विक्री होत आहे.
◼️ अत्यंत कमी दर असल्यामुळे खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अधिक वाचा: राज्यातील साडेसात हजार खतविक्रेत्यांना कृषी विभागाचा 'हा' इशारा; अन्यथा दुकानांना टाळे लागणार