Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांसाठी 'ह्या' योजनेतून २५ हजार कोटींची तरतूद; लाभाचे पैसे थेट खात्यात जमा होणार

शेतकऱ्यांसाठी 'ह्या' योजनेतून २५ हजार कोटींची तरतूद; लाभाचे पैसे थेट खात्यात जमा होणार

Provision of Rs 25,000 crores for farmers under this scheme; Benefit money will be deposited directly into the account | शेतकऱ्यांसाठी 'ह्या' योजनेतून २५ हजार कोटींची तरतूद; लाभाचे पैसे थेट खात्यात जमा होणार

शेतकऱ्यांसाठी 'ह्या' योजनेतून २५ हजार कोटींची तरतूद; लाभाचे पैसे थेट खात्यात जमा होणार

Krushi Samruddhi Yojana 2025 : शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे.

Krushi Samruddhi Yojana 2025 : शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Krushi Samruddhi Yojana 2025 शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे.

कृषी समृद्धी असे नाव असलेल्या या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांत तब्बल २५,००० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे.

या योजनेचा निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, २०२५-२६ पासून तिची अंमलबजावणी सुरू होईल.

पीक योजनेतील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गैरप्रकारामुळे अनेक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. त्यात सुधारणा करून नवीन पीक विमा योजना राज्य शासनाने लागू केली आहे.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी 'कृषी समृद्धी' योजना आता राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाना मोठा फायदा होणार आहे.

राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही कृषी समृद्धी योजना राबवली जाणार आहे.

हवामान बदल, भांडवली गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

क्लस्टर आधारित शेतीस प्रोत्साहन
◼️ योजनेंतर्गत शेतकरी समूह किंवा गटांना एकत्रितपणे शेतीसाठी प्रोत्साहित केले जाते.
◼️ गटशेतीमुळे इनपुट खर्चात बचत होऊन, संलग्न प्रक्रियांसाठी मोठी मदत होते.
◼️ मार्केटिंग व बँडिंगसाठी सामायिक धोरण तयार केले जाते.
◼️ बागायती व उत्पादनासाठी निधी आणि मार्गदर्शन मिळते, ज्यामध्ये आधुनिक साधने, सिंचन सुविधा, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस इत्यादींवर भर दिला जातो.
◼️ पारदर्शक प्रणाली, काटेकोर अंमलबजावणी व अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळवून देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

अनुदानाची तरतूद काय?
◼️ या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सिंचन, यांत्रिकीकरण, संरक्षित शेती (शेडनेट, पॉलीहाऊस, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर प्रक्रिया व मूल्यसाखळी विकास यासाठी अनुदानाची तरतूद केली आहे.
◼️ विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून २ टक्के, १.५ टक्के, ५ टक्के प्रीमियम आकारले जाते, बाकी किंमत शासनाकडून भरली जाते.
◼️ पिकांच्या क्लस्टर लिस्टमध्ये सहभागी शेती गटांना प्रमुख प्राधान्य मिळणार आहे.

लाभार्थी शेतकरी कोण?
◼️ जमीन धारक शेतकरी, गटशेती करणारे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा संघ यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
◼️ केंद्र शासनाच्या निकषानुसार पात्र असलेले सर्व लहान-मध्यम व मोठे शेतकरी, सर्व गटाची सदस्यता स्वीकारणारे शेतकरीही लाभार्थी होऊ शकतात.

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल; आता मिळणार वाढीव कर्ज?

Web Title: Provision of Rs 25,000 crores for farmers under this scheme; Benefit money will be deposited directly into the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.