पुणे : पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले आहेत.
निधी वितरणचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार आहे. तर राज्यातील कार्यक्रमाबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये देण्यात आला होता. तब्बल चार महिन्यांनंतर २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधण्यात आला आहे.
यात सर्वाधिक ५ लाख ४५ हजार २८० शेतकरीअहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केला होता.
केंद्र सरकारकडून त्यानंतर २२ व्या हप्त्यासाठी लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. हा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळेल असे बोलले जात होते. मात्र, तो मुहूर्त हुकला.
पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यात राज्यातील ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र ठरले होते. तर २२ व्या हप्त्यासाठी ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यानुसार आताच्या हप्त्यात १ लाख २ हजार ५९० शेतकरी वाढले आहेत.
योजनेच्या निधी वितरणाचा मुख्य सोहळा आसामची राजधानी गुवाहाटी येथे शुक्रवारी (दि. १३) होणार आहे. तर राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
निवडणुकीपूर्वी हप्ता◼️ पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता यापूर्वी जानेवारीअखेर देण्यात येईल, असे बोलले जात होते.◼️ त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सात फेब्रुवारीपूर्वी हा निधी देण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती.◼️ मात्र, आता आसाम, पश्चिम बंगालससह अन्य राज्यांच्या विधानसभा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधण्यात आला आहे.◼️ योजनेचा २१ वा हप्ता दिल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी हा हप्ता दिला जात आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
याप्रमाणे आहेत पहिले पाच लाभार्थ्यांचे जिल्हे◼️ अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी◼️ सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ९२ हजार ४४१ शेतकरी◼️ कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ८६९ शेतकरी◼️ सातारा जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ६६८ शेतकरी◼️ पुणे जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार ७०६ शेतकरी लाभार्थी ठरले आहेत.
अधिक वाचा: पीएम किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी; 'ह्या' निकषांत बसत नसल्यास मिळणार नाही हप्ता
Web Summary : The 22nd installment of PM Kisan Samman Nidhi will be credited on March 13th. Over 91 lakh farmers in Maharashtra are eligible. Ahilyanagar tops with 5.45 lakh beneficiaries, followed by Solapur, Kolhapur, Satara and Pune. The main event will be held in Guwahati.
Web Summary : पीएम किसान सम्मान निधि की 22वीं किस्त 13 मार्च को जमा होगी। महाराष्ट्र में 91 लाख से अधिक किसान पात्र हैं। अहिल्यानगर 5.45 लाख लाभार्थियों के साथ शीर्ष पर है, जिसके बाद सोलापुर, कोल्हापुर, सतारा और पुणे हैं। मुख्य कार्यक्रम गुवाहाटी में होगा।