Lokmat Agro >शेतशिवार > पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?

पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?

PM Kisan's 20th installment will be deposited in the account soon; How to check your name in the list? | पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?

पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?

Pm Kisan Hapta पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Pm Kisan Hapta पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM Kisan Scheme योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २० जून रोजी हा हप्ता जारी केला जाऊ शकतो. पण, अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत देते.

पंतप्रधान मोदींनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात या योजनेचा १९ वा हप्ता शेवटचा जारी केला होता, आणि तेव्हापासून शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तर पैसे मिळणार नाहीत
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ओटीपी आधारित ई-केवायसी (eKYC) करणे आता अनिवार्य आहे. जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

पीएम किसान यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?
◼️ तुम्हाला २० वा हप्ता मिळणार की नाही, हे तपासणे खूप सोपे आहे.
◼️ सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
◼️ वेबसाइटवर 'लाभार्थी यादी' (Beneficiary List) लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा.
◼️ आता तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
◼️ सर्व माहिती भरल्यानंतर 'गेट रिपोर्ट' (Get Report) वर क्लिक करा.
◼️ तुमच्या स्क्रीनवर सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, जिथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

अधिक वाचा: राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, महाॲग्री-एआय धोरणाला मंजुरी; कसा होणार शेतीला फायदा?

Web Title: PM Kisan's 20th installment will be deposited in the account soon; How to check your name in the list?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.