Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर

Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर

Peru Fal : Why should you eat Peru guava in winter? What are the benefits; Read in detail | Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर

Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर

Guava Fruit हिवाळ्यात अनेकजण पेरूचे सेवन मोठ्या आवडीने करतात. या काळात लाल पेरूही उपलब्ध असतो. पेरूचे अनेक फायदे आहेत.

Guava Fruit हिवाळ्यात अनेकजण पेरूचे सेवन मोठ्या आवडीने करतात. या काळात लाल पेरूही उपलब्ध असतो. पेरूचे अनेक फायदे आहेत.

हिवाळ्यात अनेकजण पेरूचे सेवन मोठ्या आवडीने करतात. या काळात लाल पेरूही उपलब्ध असतो. पेरूचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे पेरूमुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठतेची संबंधित समस्या दूर होतात, वजन नियंत्रणात राहते.

असे अनेक फायदे असलेले पेरू फळ हिवाळ्यात नक्की खावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. पेरूचे सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्वचा सोलून कच्चा खाणे. त्याचा रस काढणे किंवा चहा बनवण्यासाठी पाने उकळणे, पेरूमध्ये कॅलरीज कमी असल्या तरी त्यात नैसर्गिक शर्करा असते.

जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील ग्लुकोजवर परिणाम होऊ शकतो, आहारात पेरुचा समावेश करणे मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक चवदार आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो.

तथापि, तो एकंदरीत संतुलित आहार आणि जीवनशैलीचा भाग असावा, असे तज्ज्ञ सांगतात, राज्यात कोणत्याही भागात पेरू सद्या सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्याचा आहारात वापर वाढवणे गरजेचे आहे.

पचनशक्ती वाढते, वजन उतरते
मधुमेही रुग्णांसाठी पेरूचे सेवन करण्याचे एक कारण म्हणजे ते वजन नियंत्रणात मदत करते. पेरूची कॅलरी संख्या कमी आहे.
• सुमारे ६८ किलो कॅलरी प्रति १०० ग्रॅम आहारात पेरूचा समावेश करून, पोषक तत्वांचा निरोगी संतुलन तयार करू शकता जे वजन कमी करण्यास मदत करतात.

संत्र्यापेक्षा जास्त 'व्हिटॅमिन सी'
• पेरूमध्ये अनेक गुणधर्म आहेत. यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
• पेरूत फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे त्याचे सेवन केल्याने वजन वाढण्यापासून रोखले जाते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू हा उत्तम स्त्रोत
• १२ ते २४ च्या कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह पेरु हा मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सुरक्षित आणि हळू उर्जेचा स्त्रोत आहे.
• पेरू हे विविध आरोग्य फायद्यांमुळे मधुमेही लोकांच्या आहारात एक मौल्यवान जोड असू शकते

पेरू भाजून खाल्ल्यास श्वसनशक्ती सुधारते
• पेरूमध्ये फायबर्स असतात. जे अन्न पचायला मदत करतात. मात्र हाच पेरू भाजून खाल्ल्याने पेरूतील फायबर्स आणि पोषकतत्त्व जास्त चांगल्या पद्धतीने अन्न पचायला मदत करतात.
• भाजलेला पेरू जर काव्या मिठासोबत खाल्ला तर हे आणखी फायद्याचं ठरू शकतं.

अधिक वाचा: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत या घटकांसाठी अनुदान सुरु; आजच करा अर्ज

Web Title: Peru Fal : Why should you eat Peru guava in winter? What are the benefits; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.