Join us

परभणी कृषी विद्यापीठ विकसित रबी बियाणे विक्री १७ सप्टेंबरपासून; कोणत्या बियाण्याला किती दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:46 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

सदरिल पीक परिसंवादात शेतकरी बांधवानी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि परभणी जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण यांनी केले आहे.

पीक परिसंवादाच्‍या तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची सद्यपरीस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रबी तेलबिया, रबी ज्वार, गहू, रबी भाजीपाला या पिकांचे लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन होणार आहे.

तसेच शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, सद्य:स्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन आदी विषयावर विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार आहे. विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

ज्वारी- वाण:  परभणी शक्ती, सुपर मोती,  परभणी मोती, परभणी ज्योती- प्रत्येक वाणाची बॅग ४ किलोची असून प्रति बॅगचा दर ५०० रुपये तर चारा ज्वारची बॅग ७ किलोची असून प्रति बॅगचा दर ८७५ रुपये असा आहे.- हुरड्याचा परभणी वसंत हा वाण १ किलोच्या बॅग मध्ये उपलब्ध असून प्रति बॅग १५० रुपये दर आहे.

हरभरा- हरभरा वाण बीडीएनजीके ७९८, बीडीएनजी ७९७, फुले विक्रम उपलब्ध आहे.- दहा किलोची बॅगची पॅकिंग असून बीडीएनजीके ७९८ या वाणाच्या दर १,२५० रुपये तर हरभराच्या इतर वाणाचा दर ९०० रुपये प्रति बॅग असा आहे.- याबरोबरच हरभरा वाण परभणी चना नंबर १६ हा नवीन वाण १ किलोची बॅग रुपये ९० प्रमाणे उपलब्ध आहे.

गहू- गहू या पिकाचे वाण एनआयएडब्ल्यू १९९४ आणि एनआयएडब्ल्यू ३०१ उपलब्ध असून बॅग पॅकिंग ४० किलोची आहे.- याचा दर २,००० रुपये प्रति बॅग असा आहे.

बाजरीबाजरीचे ए.बी. पी.सी.-४-३ व ए.एच.बी-१२०० हे वाण १ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून अनुक्रमे रु.९० आणि रु.१९० प्रती बॅग असा दर आहे.

तीळतिळाची टीएलटी- १० जात १ किलोची बॅग २५० रुपये.

सुर्यफूलसुर्यफूलाची एल.एस.एफ.एच-१७१ या वाणाच्या २ किलोची बॅग १,००० रुपये दराने मिळणार आहे.

जवसजवसाचा एलएसएल ९३ हा वाण उपलब्ध असून ५ किलोची बॅग ६५० रुपये दरानुसार उपलब्ध आहे.

करडईकरडईचे पीबीएनएस ८६ उपलब्ध असून ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून बॅगचा दर ५५० रुपये असा आहे.

भेंडीभेंडीची परभणी क्रांती जात १ किलोची बॅग ८५० रुपये.

याप्रमाणे बियाणे रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे.

अधिक वाचा: Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख

टॅग्स :रब्बीरब्बी हंगामशेतकरीशेतीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणीज्वारीगहूसुर्यफुलबाजरीहरभरापीकपेरणीभाज्यापीक व्यवस्थापन