Lokmat Agro >शेतशिवार > Orange Planting Techniques : संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर

Orange Planting Techniques : संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर

Orange Planting Techniques: This is the mantra for economic growth through the sweetness of oranges. Read in detail. | Orange Planting Techniques : संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर

Orange Planting Techniques : संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर

Orange Planting Techniques : शेतकऱ्यांनी आपल्याला मालाची थेट विक्री करुन चांगले उत्पन्न कसे मिळवता येते या विषयी कृषिभूषण भीमराव कडू यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला. वाचा सविस्तर

Orange Planting Techniques : शेतकऱ्यांनी आपल्याला मालाची थेट विक्री करुन चांगले उत्पन्न कसे मिळवता येते या विषयी कृषिभूषण भीमराव कडू यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

विजय नागपुरे

कळमेश्वर : नागपुरी संत्र्याला (Orange) योग्य दर मिळत नसल्याने बागा जगविणे कठीण झाले आहे. पण, बागांची योग्य निगा व व्यवस्थापनाचे नियोजन केल्यास तसेच संत्र्याची शेतातच प्रतवारी करून उत्तम प्रतीच्या संत्र्याची आपणच थेट ग्राहकांपर्यंत विक्री केल्यास आर्थिक उन्नती (Economic Growth) साधता येते.

यातून शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांना अर्थार्जनाचे चांगले साधन मिळते. ते उद्योजक शेतकरी होऊ शकतात, असा सल्ला कृषिभूषण तथा संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी दिला.

त्यांची पारडी (देशमुख), ता. कळमेश्वर शिवारात ७ एकर शेती आहे. मागील ४० वर्षापासून संत्र्याचे उत्पादन घेणाऱ्या भीमराव कडू यांनी दोन एकरमध्ये नागपुरी संत्रा व दोन एकरात मोसंबीची बाग (Mosambi Garden) तयार केली आहे. सन १९७२ मध्ये पहिल्यांदा ७५० झाडांची लागवड (Cultivation) करून बाग तयार केली व नागपुरी संत्र्याचे उत्पादन घ्यायला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडे संत्र्याची उत्पादकता घटत असताना त्यांनी काही वर्षांपूर्वी एकरी ४० ते ४२ टन संत्रा उत्पादन घेण्याचा विक्रमही केला आहे.

संत्रा बागेत त्यांनी चिकूची लागवड करून आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. झाडांची सुनियोजित छाटणी तसेच खत, पाणी व इतर बाबींच्या योग्य नियोजनामुळे संत्र्याची उत्पादकता वाढविता येते, हे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले आहे.

बागेची निगा तसेच संत्रा ग्रेडिंग, पॅकिंग व बाजारपेठ माहितीसाठी विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, इतर बाबींच्या माहितीसाठी सहायक प्रशासन अधिकारी प्रवीण कोपुलवार, डी. सी. कुरळकर, दीपक जंगले, अंकुश कंकाळे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

विक्रीची पद्धती

• बागेतील फळे तोडल्यानंतर त्यांची योग्य प्रतवारी केली जाते. चांगल्या प्रतीचा संत्रा आकर्षक बॉक्समध्ये पॅक केल्यानंतर ते बॉक्स पुणे शहरात विक्रीला पाठवितो.

• वाहतुकीसाठी प्रसंगी खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करतो. या संत्रा शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. यात कुठेही मध्यस्थ अथवा व्यापारी नसतो.

कीड व्यवस्थापन

हरभरा, गहू, कापूस, तूर आदी पिके घेतात. पक्षी थांबे, कामगंध सापळे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जैविक कीटकनाशक आदींचा वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करतात.

इस्रायल अभ्यास दौरा व तंत्रज्ञान अवलंब

* भीमराव कडू यांनी इस्रायल अभ्यास दौरा केला आणि संत्रा लागवड व संगोपनात इंडो-इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला. यात त्यांनी २९ वर्षे वयाच्या बागेचे प्रोनिंग व टॉपिंग केले. त्यामुळे ती बाग नव्याने जोमदार बहरली.

* या तंत्रज्ञानामुळे ७०० झाडांपासून किमान २० टन संत्रा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा सविस्तर : Jamin Mojani : जमीन मोजणी आता होणार सॅटेलाईटव्दारे! वाचा सविस्तर

Web Title: Orange Planting Techniques: This is the mantra for economic growth through the sweetness of oranges. Read in detail.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.