सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील २७ साखर कारखान्यांनी शासकीय रक्कम भरल्याने गाळप परवाना देण्यात आला आहे. इतर साखर कारखान्यांचे परवाने पैसे न भरल्याने पेंडिंग असताना एफआरपी थकविल्याने व इतर कारणांमुळे सहा कारखाने गॅसवर आहेत.
राज्यातील साखर हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. बरेच साखर कारखाने सुरू झाले असले तरी साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप गाळप परवाने दिले नाहीत.
शासकीय देणी त्यामध्ये मुख्यमंत्री निधी, पूरग्रस्त निधी, गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीची रक्कम भरणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले जात आहेत. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अशा २७ साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यंत गाळप परवाने दिले आहेत.
सिद्धेश्वर सोलापूर, गोकुळ धोत्री व जयहिंद शुगर आचेगाव या साखर कारखान्यांनी मागील वर्षांचे शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याने या तीन साखर कारखान्यांचे गाळप परवाना अर्ज साखर आयुक्त कार्यालयाने परत पाठविले आहेत.
या साखर कारखान्यांनी शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम दिली नसल्याचे सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मातोश्री लक्ष्मी शुगर व इतर दोन अशा तीन साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल केले नसल्याचे सांगण्यात आले.
यांना मिळाले गाळप परवाने...
• सिद्धनाथ शुगर तिर्हे, सासवड माळी शुगर, श्री. पांडुरंग श्रीपूर, श्री. शंकर सहकारी, धाराशिव शुगर, ओंकार शुगर (जुना विठ्ठल कार्पोरेशन), ओंकार सहकारी, आष्टी शुगर, सीताराम महाराज खड़ीं, युरोपियन शुगर, ओंकार पॉवर कॉर्पोरेशन (जुना व्ही.पी. शुगर), श्री. विठ्ठल सहकारी, धाराशिव साखर कारखाना (जुना सांगोला), नॅचरल शुगर तसेच
• श्रीसंत दामाजी सहकारी, श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, भैरवनाथ शुगर, आयान (जुना बाणगंगा), अवताडे शुगर, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, भैरवनाथ शुगर (जुना शिवशक्ती), भैरवनाथ शुगर, विठ्ठलराव शिंदे करकंब, भाऊसाहेब बिराजदार, मांजरा शुगर (जुना कचेश्वर), भैरवनाथ शुगर (जुना तेरणा), भैरवनाथ शुगर या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे.
हेही वाचा : हवामान बदलताना आपण आजारी का पडतो? जाणून घ्या कारणे आणि त्यावरील उपयांची सविस्तर माहिती
