Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > ओंकार शुगर ग्रुपचे राज्यात ५० लाख टन उसाचे गाळप; उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

ओंकार शुगर ग्रुपचे राज्यात ५० लाख टन उसाचे गाळप; उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Omkar Sugar Group crushes 50 lakh tonnes of sugarcane in the state; Sugarcane bills deposited in farmers' accounts | ओंकार शुगर ग्रुपचे राज्यात ५० लाख टन उसाचे गाळप; उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

ओंकार शुगर ग्रुपचे राज्यात ५० लाख टन उसाचे गाळप; उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

ओंकार शुगर ग्रुपने उसाला सर्वाधिक भाव देण्याचे धोरण घेतल्याचे सांगून ते म्हणाले, की शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे.

ओंकार शुगर ग्रुपने उसाला सर्वाधिक भाव देण्याचे धोरण घेतल्याचे सांगून ते म्हणाले, की शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे.

श्रीगोंदा : ओंकार शुगर ग्रुपच्या विविध कारखान्यांनी चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली.

हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ४ लाख २३ हजार १८६ मे. टन गाळप केले होते. त्यासाठी १३१ कोटी १८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहे.

ओंकार शुगर ग्रुपने उसाला सर्वाधिक भाव देण्याचे धोरण घेतल्याचे सांगून ते म्हणाले, की शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे.

कुठेही वजन करा आणि ऊस घेऊन या. काटा बरोबरच राहील, शेतकऱ्यांना सर्वोच्च ऊस दर दिला जाईल. बिल वेळेत मिळेल, ही आमची भूमिका होती.

ओंकार शुगर ग्रुपच्या विविध युनिट्समध्ये आधुनिक यंत्रसामग्री, पारदर्शक व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध गाळपामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला गेला.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. शेतकऱ्यांचा ऊस हा आमची जबाबदारी आहे, या भावनेतून ओंकार ग्रुप काम करीत असल्याचे बोत्रे पाटील म्हणाले.

अधिक वाचा: ट्रम्पचा झटका कापूस, सोयाबीन अन् इथेनॉल उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

Web Title : ओंकार शुगर ग्रुप ने 50 लाख टन गन्ने की पेराई की, किसानों को भुगतान

Web Summary : ओंकार शुगर ग्रुप ने 50 लाख टन गन्ने की पेराई की और किसानों के खातों में ₹1270 करोड़ जमा किए। समूह उचित मूल्य और समय पर भुगतान को प्राथमिकता देता है, कुशल संचालन और आधुनिक मशीनरी के माध्यम से किसानों की वित्तीय भलाई सुनिश्चित करता है। समूह किसानों को जिम्मेदारी मानता है।

Web Title : Omkar Sugar Group Crushes 5 Million Tons, Pays Farmers

Web Summary : Omkar Sugar Group crushed 5 million tons of sugarcane and deposited ₹1270 crore into farmers' accounts. The group prioritizes fair prices and timely payments, ensuring farmers' financial well-being through efficient operations and modern machinery. The group considers farmers responsibility.