अक्कलकोट : ओंकार साखर कारखाना प्रा.लि. (रुद्देवाडी, ता. अक्कलकोट) यांच्या वतीने गळीत हंगाम सन २०२५-२६ साठीचा ऊस दर जाहीर केला आहे.
यंदा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत प्रतिटन ३,००० रुपये दर निश्चित केला असून एप्रिलनंतर दर वाढवून ३,२०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी याची माहिती दिली. जाहीर ऊस दरापैकी प्रतिटन २,९०० रुपये पहिला हप्ता तत्काळ अदा केला जाणार आहे.
उर्वरित १०० रुपये दुसऱ्या हप्त्यात दिवाळी सणाच्या काळात शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. तसेच १ मार्च २०२६ पासून गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन अतिरिक्त १०० रुपये देऊन एकूण दर ३,१०० रुपये केला जाणार आहे.
पुढे १ एप्रिल २०२६ पासून गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन अतिरिक्त २०० रुपये देऊन एकूण दर ३,२०० रुपये देण्यात येणार आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे सहकार्य व विश्वास कारखान्यास कायम लाभत आहे.
भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही जनरल मॅनेजर व्ही. एम. गायकवाड यांनी दिली.
अधिक वाचा: राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?
