दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील मुख्य कमावत्या स्त्री किंवा पुरुष सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंब आर्थिक संकटात सापडते.
अशा वेळी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक कुटुंबांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपये दिले जातात.
ही मदत कुटुंबाला तत्काळ आधार देते. अर्ज संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात, तलाठी कार्यालयात करता येतो.
पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती?
मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीचे वय प्रमाणपत्र, तलाठी, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र (कुटुंब बीपीएल असल्याचे आणि मृत मुख्य कमावता असल्याचे), अर्जदाराचे आधारकार्ड, बँक खाते तपशील, रहिवासी पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कसा व कुठे करायचा अर्ज?
◼️ अर्ज तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात, तलाठी कार्यालयात करता येतो.
◼️ महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करता येतो. अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडावीत.
एकरकमी मिळते मदत
◼️ केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते.
◼️ गेल्या वर्षभरात राज्यात अनेक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे
...तर लाभ मिळत नाही
◼️ मृत्यूनंतर २ वर्षांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. उशीर झाल्यास लाभ मिळत नाही.
◼️ ही योजना पात्र कुटुंबांना ही योजना उपलब्ध आहे. गरजू कुटुंबांनी त्वरित अर्ज करावा.
कुटुंब दारिद्रय रेषेखालील असावे
◼️ केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.
◼️ त्यासाठी मृत व्यक्ती मुख्य कमावता सदस्य असावा.
◼️ मृत व्यक्तीचे वय मृत्यूच्या वेळी १८ ते ५९ वर्षे असावे.
◼️ मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती असावा, सर्व जाती-धर्मातील कुटुंब यासाठी पात्र आहेत.
अधिक वाचा: जमिनीला आलाय सोन्याचा भाव; शेतजमिनी विकण्याकडे शेतकऱ्यांचा का वाढतोय कल? वाचा सविस्तर
