Lokmat Agro >शेतशिवार > आता रेकॉर्ड विभागात जायची गरज नाही; शेतजमिनीची सर्व कागदपत्रे लवकरच मिळणार ऑनलाईन

आता रेकॉर्ड विभागात जायची गरज नाही; शेतजमिनीची सर्व कागदपत्रे लवकरच मिळणार ऑनलाईन

Now there is no need to go to the records department; all agricultural land documents will soon be available online | आता रेकॉर्ड विभागात जायची गरज नाही; शेतजमिनीची सर्व कागदपत्रे लवकरच मिळणार ऑनलाईन

आता रेकॉर्ड विभागात जायची गरज नाही; शेतजमिनीची सर्व कागदपत्रे लवकरच मिळणार ऑनलाईन

महसूल, नगर भूमी अभिलेखकडील सर्व १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महसूल, नगर भूमी अभिलेखकडील सर्व १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल, नगर भूमी अभिलेखकडील सर्व १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे.

ही सर्व कागदपत्रे संबंधितांना https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येणार आहेत.

सध्या प्रमाणिकरणासाठी कार्यालयात जावे लागत आहे; मात्र कार्यालयातही जावे लागू नये, म्हणून नगर भूमी अभिलेखकडील सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही झाल्यानंतर तहसीलमधील रेकॉर्ड रूम आणि नगर भूमी अभिलेख कार्यालयातील नक्कल देण्यासाठीची दुकानदारी बंद होणार आहे. महसूलकडील आणि नगर भूमी अभिलेखकडील कागदपत्रे कार्यालयात जाऊन मिळवताना हेलपाटे मारावे लागतात.

मागतील तितके पैसे द्यावे लागतात. प्रत्येक तहसीलमधील रेकॉर्ड रूम आणि भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी पैसे घेऊन नक्कल देणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत.

यातून सुटका करून घेण्यासाठी या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हवी ती कागदपत्रे डाऊनलोड करून त्यावर सही हवी असल्यास ती घेण्यासाठी कार्यालयात जावे लागत आहे.

सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही झाल्यानंतर कार्यालयातही जाण्याची आवश्यकता नाही. शासनाचे ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर ते घरबसल्याही मिळवता येणार आहे. यामध्ये पारदर्शकता येणार आहे.

ही कागदपत्रे डाऊनलोड करा
टिप्पन बुक, गुणाकार बुक, आकारफोड पत्रक, आकार प्रपत्र, कमी जास्त पत्रक, आकार बंध, नऊ तीन नऊ चार, शेत पुस्तक, दुरुस्ती अभिलेख, एकत्रीकरण, जबाबधारिका, शेतपुस्तक, ताबा पावत्या, चौरस नोंद वही, मिळकत पत्रिका, वसलेवार पुस्तक, जुने सातबारा, आठ अ, फेरफार, नकाशा, चालू सातबारा आठ अ, सिटी सर्व्हेतील मालमत्ता पत्रक यासह शेत, घरासंबंधीची सर्व कागदपत्रे.

नगर भूमी अभिलेखकडील सर्व कागदपत्रांचे डिजिटल सहीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर नगरभूमापनकडील सर्व कागदपत्रे डिजिटल सहीचे ऑनलाईन मिळवता येतील. - शिवाजी भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर

अधिक वाचा: साखर कारखान्यांना इथेनॉलने तारले; शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे मिळणार का?

Web Title: Now there is no need to go to the records department; all agricultural land documents will soon be available online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.